शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
3
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
4
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
5
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
6
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
7
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
8
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
9
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
10
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
11
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
12
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
13
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
14
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
15
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
16
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
17
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
18
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
19
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
20
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ भाजीमंडईतील हर्रास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

विठ्ठलवाडीतील भाजी मंडई सुदर्शन ठोक भाजी विक्रेता वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून चालविली जाते. या संघटनेअंतर्गत सर्व भाजी अडते काम करतात. रात्री ३ वाजतापासून भाजी मंडईचे कामकाज सुरू होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक प्रतिबंध येथील व्यवहारावर आले आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणत्याच सुविधा दिल्या जात नाही.

ठळक मुद्देठोक भाजी विक्रेत्यांचा निर्णय : सील केलेल्या भागातूनही येतात किरकोळ खरेदीदार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाचा धोका थांबविण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहे. येथील मुख्य भाजी मंडईत खरेदीसाठी थेट सील केलेल्या भागातील खरेदीदार येत असल्याने भाजी विक्रेता वेलफेअर असोसिएशनने गुरुवारपासून भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून भाजी मार्केटमध्ये सुविधा मिळत नाही. तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो, यातून जीविताला धोका असल्याची चिंता असोसिएशनने व्यक्त केली आहे.विठ्ठलवाडीतील भाजी मंडई सुदर्शन ठोक भाजी विक्रेता वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून चालविली जाते. या संघटनेअंतर्गत सर्व भाजी अडते काम करतात. रात्री ३ वाजतापासून भाजी मंडईचे कामकाज सुरू होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक प्रतिबंध येथील व्यवहारावर आले आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणत्याच सुविधा दिल्या जात नाही. भाजी मार्केटमध्ये जंतू नाशकाची फवारणी करावी, अशी मागणी नगरपरिषदेकडे वारंवार केली. त्यानंतरही याकडे लक्ष दिले जात नाही. किरकोळ भाजी विक्रेत्यासोबतच काही घरगुती खरेदीदारही मंडईत येतात. येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. भाजी खरेदी-विक्रीही प्रत्यक्ष हात लावूनच केली जाते. कोरोना रुग्ण सापडलेल्या प्रतिबंधित भागातून मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते मंडईत येतात. प्रतिबंधित भागातील विक्रेते घराबाहेर पडतातच कसे हे कोडे आहे. यातून शहरात कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याची भीती आहे. प्रशासन सहकार्य करीत नसल्याने अडचणीच्या काळातही मंडईतील हर्रास बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.पोलिसांच्या जाचक अटींमुळे अनेकदा भाजीपाल्याची विक्री होत नाही. किरकोळ विक्रेत्यांना उधारीत माल द्यावा लागतो. यामुळे ठोक विक्रेत्यांचेही नुकसान होत आहे. नगरपालिकेचे पथक येऊन मंडईत मास्क न लावणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे यांच्याबद्दल थेट ठोक भाजी विक्रेत्यालाच जबाबदार धरतात. त्यांच्या दंडात्मक कारवाईची भीती वाटते. या सर्व कारणांनीच ठोक भाजी विक्रेता असोसिएशनने व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.अत्यावश्यक सेवेच्या पासनंतरही पडतात लाठ्याठोक व किरकोळ भाजी विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवेची पास दिली आहे. त्यानंतरही रात्री ३ वाजता भाजीमंडईत जाताना पोलिसांकडून हटकले जाते. एका किरकोळ भाजी विक्रेत्याला पोलिसांच्या लाठ्या बसल्या. यात त्याच्या हाताचे बोटही फ्रॅक्चर झाले. संकटकाळात सेवा देणे हा आमचा उद्देश आहे. प्रशासन सहकार्य करीत नसल्याने आणखी धोका पत्करू शकत नाही, असे भाजी विक्रेत्यांनी स्पष्ट केले.प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्यास या संकटात ठोक भाजी विक्रेते काम करायला तयार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान व किरकोळ विक्रेत्यांचा रोजगार बुडतो, त्यामुळे प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे.- गजानन बरेअध्यक्ष, ठोक भाजी विक्रेता असोसिएशन.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार