शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी सुनावले तरुणीला खडेबोल

By admin | Updated: October 5, 2015 02:31 IST

मोबाईलवर बोलत सुसाट दुचाकी चालविणाऱ्या एका तरुणीला खुद्द पालकमंत्र्यांनीच वाहतूक नियमांचे डोज देत खडेबोल सुनावले.

दारव्हा मार्ग : सुसाट दुचाकीवर मोबाईल संभाषण यवतमाळ : मोबाईलवर बोलत सुसाट दुचाकी चालविणाऱ्या एका तरुणीला खुद्द पालकमंत्र्यांनीच वाहतूक नियमांचे डोज देत खडेबोल सुनावले. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास येथील उद्योग भवनासमोर हा प्रसंग अनेकांनी अनुभवला. सदर तरुणीला वाहतूक पोलिसांच्या हवाली करून तिच्या पालकांंना पाचारण करण्याचे आदेश दिले. पालकमंत्री संजय राठोड यांचा ताफा सकाळी ११ वाजता दारव्हा मार्गाने जात होता. एक तरुणी आपल्या दुचाकीने सुसाट वेगाने जात होती. त्याचवेळी ती मोबाईलवरही बोलत होती. हा प्रकार पालकमंत्र्यांच्या लक्षात आला. चालकाला सदर दुचाकी थांबविण्याचे सांगितले. तोपर्यंत अनेक वाहनांना कट मारीत सदर तरुणी उद्योग भवनासमोर पोहोचली. एक कार आडवी आल्याने तिची गती मंदावली आणि याच वेळी पालकमंत्र्यांनी आपल्या शासकीय वाहनातून उतरुन तरुणीला थांबविले. मात्र पालकमंत्र्यांनी तिला अडविलेच. वाहतूक नियमांचे डोज देत स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात का घालतेस असा प्रश्न केला. पालकमंत्री राठोड यांनी सोबत असलेल्या पोलिसांना या तरुणीच्या पालकांना पाचारण करण्याचे आदेश दिले. मात्र सदर तरुणी घाटंजी तालुक्यातील मुरलीची असल्याचे पुढे आले. त्यामुळे सदर तरुणीला वाहतूक शाखेच्या ताब्यात देऊन पालक येईपर्यंत सोडू नका, अशी तंबी दिली. दरम्यान वाहतूक शाखेचा ताफा उद्योग भवनापुढे पोहोचला. सदर तरुणीला वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले. वडील येईपर्यंत तिला तेथेच बसवून ठेवण्यात आले. तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)