शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

गावठाण मालमत्तेची तयार होणार मिळकत पत्रिका

By admin | Updated: January 13, 2016 03:01 IST

गावागावात वादाचे मूळ असलेल्या जागेची मोजणी करण्यासाठी आता भूमिअभिलेख विभागाने ई-महाभूमी अभियान हाती घेतले आहे.

भूमी अभिलेख विभागाचे महाभूमी अभियान : पहिल्या टप्प्यात १३० गावठाणांची होणार मोजणीयवतमाळ : गावागावात वादाचे मूळ असलेल्या जागेची मोजणी करण्यासाठी आता भूमिअभिलेख विभागाने ई-महाभूमी अभियान हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३० गावांतील गावठाणाची मोजणी करण्यात येणार असून मालमत्तेची मिळकत पत्रिकाही तयार केली जाणार आहे. कायदेशीर नोंदणीमुळे वाद मिटण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागामध्ये परंपरागत पद्धतीनेच जागेचे क्षेत्र निर्धारण केले जाते. पिढीजात मिळालेल्या या जागेची कुठेही अधिकृत नोंद नसते. तोंडी व्यवहारातूनच या जागांचे हस्तांतरण केले जाते. अनेक ठिकाणी सीमांकनावरून वाद झाले आहे. अनेक ठिकाणी तर एकाच कुटुंबात टोकाचे वाद दिसून येतात. त्यातून गावाची शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते. शिवाय फौजदारी खटलेही दाखल होतात. यातून संबंधित कुटुंबाचे तर नुकसान होतेच. गावाचेही यातून मोठे नुकसान होते. हा प्रकार टाळण्यासाठी आता भूमिअभिलेख विभागाने ई-महाभूमी अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यातील २०११ च्या जनगनणेनुसार दोन हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावातील मालमत्तेची मोजणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील अशा १३० गावांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पाच शहरातील गावठाणांची मोजणी करण्यात आली होती. त्यानंतर यवतमाळ तालुक्यातील येळाबारा, बाभूळगावमधील गळव्हा, कळंबमधील सावरगाव, नांझा, केळापूरमधील उमरी, घाटंजीतील मानोली, आर्णीतील दाभडी, महागावमधील पोहंडूळ, पुसदमधील श्रीरामपूर, दिग्रस तालुक्यातील माळहिवरा, दारव्हा तालुक्यातील वडगाव गाढवे आणि नेर तालुक्यातील धनज येथे गावठाणाची मोजणी करण्यात आली होती. तेथे तब्बल १२ हजार ७७ मिळकत पत्रिकांचे वितरण करण्यात आले होते. कायदेशीर नोंदणीमुळे भविष्यात होणारे वाद मिटणार आहे. शिवाय गावातील मालमत्तेची अधिकृत नोंद ठेवता येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीला कर आकारणीतही फायदा होईल.गावठाण मोजणीतून हद्द निश्चित झाल्याने शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या विकास निधीतील कामे गावठाण हद्दीत करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. त्या क्षेत्राबाहेरचे काम इतर यंत्रणेकडून करून घ्यावे लागते. कोणत्याही कामासाठी भूमिअभिलेख विभागाने तयार केलेला नकाशाच ग्राह्य मानला जातो. त्याचाच आधार घेऊन गावातील विकास कामांचे नियोजन करता येणार आहे. भविष्यातील अतिक्रमणाचा प्रश्नही निकाली निघणार आहे. ग्रामीण भागासाठी हे अभियान अतिशय फायदेशीर ठरणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)