शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

गॅसधारकांचे केरोसिन बंद

By admin | Updated: October 24, 2015 02:33 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने राज्यातील केरोसिन वाटपाबाबतचे धोरण शासनाने जाहीर केले आहे.

यादी मागविली : न्यायालयाच्या आदेशावरून राज्य शासनाचे धोरणआरीफ अली बाभूळगावमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने राज्यातील केरोसिन वाटपाबाबतचे धोरण शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार गॅस सिलिंडर धारकांचे केरोसिन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. यापुढे महिन्याकाठी मिळणारे ३०० मिलीलिटर रॉकेलसुद्धा बंद केले गेले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत ग्रामीण व शहरी भागाकरिता समान परिमान ठरवावे अशा आशयाची रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. सदर परिमाणामुळे ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांवर अन्याय होत असल्याने ग्रामीण व शहरी भागांकरिता समान परिमाण ठरवावे, असे या याचिकेमध्ये नमूद करण्यात आले होते. याचिकेतील मागणीप्रमाणे राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अंमलबजावणी सुरु केली आहे. मात्र पूर्वीचेच परिमाण लागू करावे असा रेटा लोकप्रतिनिधींकडून सुरू झाला आहे. तशी लेखी निवेदनेही राज्यशासनाकडे प्राप्त झाली आहे. गरीब जनता मुख्यत्वे खेडेगावात राहात असल्याने त्यांना रॉकेल मिळत नसल्याच्या तक्रारी सरकारकडे केल्या गेल्या. या संबंधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दुसरी जनहीत याचिका दाखल झाली. या याचिकेच्या संबंधात न्यायालयाने राज्य शासनाला रॉकेल वितरणाबद्दल नव्याने धोरण ठरवावे असा आदेश दिला आहे. या आदेशामुळे राज्य शासनाने नुकतेच सुधारित आदेश काढले आहे. सुधारित आदेशानुसार गॅसधारकांना मिळणारे केरोसिन आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. बिगर गॅस शिधापत्रिकाधारकांना माणसी दोन लिटर, दोन व्यक्ती तीन लिटर व तीन व्यक्तीपेक्षा कितीही जास्त असो त्यांना महिन्याकाठी चार लिटर केरोसिन दिले जाणार आहे. असे परिपत्रक राज्य शासनाच्या अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांनी नुकतेच काढले आहे. गॅसधारकांची नावे गॅसवितरकांकडून महसूल यंत्रणेने मागविली आहे. यामुळे दिवा लावण्यासाठीसुद्धा रॉकेल मिळणार नसल्याने गॅसधारकांची चिंता वाढली आहे. सध्या अनेक गॅस धारक अनेक दिवसपर्यंत रॉकेलचा वापरच करीत नाही. मात्र लाभार्थ्यांच्या यादीत त्यांची नावे असतात.