शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाकडून अनुदानावर गॅस

By admin | Updated: September 22, 2014 23:36 IST

सध्या प्रचंड जंगलतोड होत असल्याने ती थांबविण्याकरिता व जंगलांचे रक्षण करण्याकरिता वन विभाग अनुदानावर ग्रामस्थांना गॅस जोडणी देणार आहे.

नांदेपेरा : सध्या प्रचंड जंगलतोड होत असल्याने ती थांबविण्याकरिता व जंगलांचे रक्षण करण्याकरिता वन विभाग अनुदानावर ग्रामस्थांना गॅस जोडणी देणार आहे. जी गावे जंगलाला अगदी लागून आहे, अशा गावातील ग्रामस्थांना या योजनेचा लाभ होणार आहे़ ग्रामीण भागात घरी गॅस जोडणी नसल्यामुळे जंगल शेजारी राहणारे ग्रामस्थ जंगलातील वृक्ष तोडून त्याचा स्वयंपाक व सरपणाकरिता सर्रास वापर करतात. त्यामुळे जंगलातील मौल्यवान वृक्षांची कत्तल होते. ही बाब लक्षात घेऊन वन विभागाने गॅस सिलिंडरसाठी आता अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जंगलाची वृक्षतोड होणार नाही, मौल्यवान झाडे नष्ट होणार नाही, या अपेक्षेने वन विभागाने ही महत्वपूर्ण योजना आखली आहे़वन विभागाने दरोगा व वनपाल यांना या योजनेबाबत सूचना दिल्या आहे़ वनपाल गावागावात जाऊन तुम्हाला वन विभागाकडून गॅस जोडणी मिळणार असल्याचे सांगत आहे़ वनपाल यांनी गावात या योजनेची माहिती देताच गॅस जोडणीसाठी लागणारे कागदपत्रे गोळा करण्याकरिता ग्रामस्थ तहसीलकडे धाव घेत आहे़ जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ही मुख्य कागदपत्रे असल्याने ती मिळण्याकरिता तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याने ग्रामस्थांना वेळेत कागदपत्रे गोळा करणे कठीण झाले आहे़ (वार्ताहर)