चोरट्या महिलांची टोळी गजाआड

By Admin | Updated: September 18, 2014 23:42 IST2014-09-18T23:42:49+5:302014-09-18T23:42:49+5:30

बसस्थानकावर प्रवासी महिलांना हेरुन त्यांना लुटणाऱ्या महिलांच्या एका टोळीचा पर्दाफाश येथील बसस्थानकावर झाला. महिलेच्या सतर्कतेनेच पाच महिलांची टोळी गजाआड करण्यात आली.

The gang of thieves and women ganggered | चोरट्या महिलांची टोळी गजाआड

चोरट्या महिलांची टोळी गजाआड

नेरची घटना : पाच महिलांचा समावेश
नेर : बसस्थानकावर प्रवासी महिलांना हेरुन त्यांना लुटणाऱ्या महिलांच्या एका टोळीचा पर्दाफाश येथील बसस्थानकावर झाला. महिलेच्या सतर्कतेनेच पाच महिलांची टोळी गजाआड करण्यात आली.
विमल मुकेश हातागडे, चंद्रकला प्रताप हातागडे, सुषमा भाई शेंडे, सीता रामदेव मानकर, प्रिया भारत मानकर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहे. दारव्हा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका संध्या पुंडलिक गावंडे (५८) या अमरावतीला एसटी बसने जात होत्या. दारव्हा ते नेरच्या दरम्यान प्रवासात काही महिला त्यांना लोटलाट करीत होत्या. लहान बालकांना घेऊन अंगावर पडत होत्या. बस नेर बसस्थानकावर आली असता गावंडे यांना बॅगमधील मोबाईल खाली पडलेला दिसला. त्यामुळे त्यांना शंका आली. बॅग तपासली असता त्यातील चार हजार रुपये लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच बसच्या वाहकाला याची कल्पना दिली. त्यावेळी सदर महिलांची झडती घेतली असता एका महिलेजवळ चार हजार रुपये आढळून आले. लगेच बस नेर पोलीस ठाण्यात लावली.त्यावेळी या पाचही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर महिलांनी पोलिसांना आपला पत्ता नागपूर येथील सांगितला असला तरी तो बनावट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. सदर महिला लहान मुलांना पुढे करून चोरी करीत होत्या. आणखीन चोरीचा छडा लागण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी )

Web Title: The gang of thieves and women ganggered