शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

केवळ चार हजारांसाठी मित्रांनीच केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच मित्र राजेश रामकृष्ण भोंगळे (३०) याने योगेशला चार हजार रूपये उसने दिले होते. हेच पैसे परत मागण्यावरून या दोघात वणीकडे जात असताना शुक्रवारी दुपारी १ वाजता गौराळा खाणीजवळ वाद झाला. यावेळी खुनातील दुसरा आरोपी सुशांत बाळनाथ पुनवटकर (३१) हा घटनास्थळी हजर होता. या दोघांनी खाणीत नेऊन योगेशला मारहाण केली व दुपट्ट्याने गळा आवळून त्याचा खून केला.

ठळक मुद्देमारेगावातील घटना : चार तासातच पोलिसांनी केला उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : उसने घेतलेल्या चार हजार रूपयावरून वाद होऊन मित्रानेच मित्राचा खून केल्याचा प्रकार मारेगाव येथे घडला. योगेश रामभाऊ गहूकर (२७) असे मृताचे नाव आहे. तर राजेश रामकृष्ण भोंगळे व सुशांत बाळनाथ बुनवटकर अशी आरोपींची नावे आहे.येथील योगेश गहुकर या अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या युवकाचा वणीतील रेल्वे क्रॉसिंगजवळ शनिवारी मृतदेह आढळला होता. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या चार तासात खुनातील आरोपींना ताब्यात घेतले व खुनाचे रहस्य उलगडले. मारेगाव येथील योगेश गहुकर हा शासकीय आयटीआयमध्ये कंत्राटी निदेशक म्हणून वर्षभरापासून कार्यरत होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच मित्र राजेश रामकृष्ण भोंगळे (३०) याने योगेशला चार हजार रूपये उसने दिले होते. हेच पैसे परत मागण्यावरून या दोघात वणीकडे जात असताना शुक्रवारी दुपारी १ वाजता गौराळा खाणीजवळ वाद झाला. यावेळी खुनातील दुसरा आरोपी सुशांत बाळनाथ पुनवटकर (३१) हा घटनास्थळी हजर होता. या दोघांनी खाणीत नेऊन योगेशला मारहाण केली व दुपट्ट्याने गळा आवळून त्याचा खून केला. योगेश मृत पावल्याचे कळताच त्याला कचऱ्यात लपवून ठेवले व योेगेशची दुचाकी घेऊन आरोपी वणीकडे निघाले. त्याची दुचाकी वणीत बेवारस सोडून ते गावाकडे परत गेले. याच रात्री आरोपी राजेश हा मित्राकडे पार्टीला हजर होता. पोलिसांनी योगेशच्या कॉल डिटेल्सवरून अनेकांचे बयाण नोंदविले. राजेशने खून केल्याचे कबुल केले. आरोपीविरूद्ध भादंवि ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.दोन्ही मित्र करीत होते स्पर्धा परीक्षेची तयारीमृतक योगेश गहूकर व मारेकरी राजेश भोंगळे हे दोघेही बीईचे शिक्षण घेत असतानापासून मित्र होते. गेल्या दोन वर्षांपासून ते मारेगावच्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारीही करीत होते. दरम्यान राजेशने खुनानंतर योगेशचे प्रेत गौराळा गिट्टी खाण परिसरात झुडूपात लपविले आणि अभ्यासिकेच्या मुलांनी आयोजित केलेल्या पार्टीत पोहोचला. त्यानंतर पहाटे खुनातील सहकारी सुशांतच्या मदतीने योगेशचा मृतदेह दुचाकीने वणी येथे नेऊन टाकला. मृतदेह घासत गेल्याने त्याच्या दोन्ही पायाची बोटे घासलेल्या अवस्थेत आढळली.

टॅग्स :Murderखून