चार ग्रामसेवक सेवेतून बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:00 AM2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:21+5:30

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी ही धडक कारवाई केली. त्यामुळे गाव प्रशासनाच्या यंत्रणेत खळबळ निर्माण झाली आहे. एम.पी. यमतकर, व्ही.ए. बेदरकर, बी.बी. सुर्ये व अनिल श्रीराम निळे अशी या ग्रामसेवकांची नावे आहेत.

Four gramservice from the service | चार ग्रामसेवक सेवेतून बडतर्फ

चार ग्रामसेवक सेवेतून बडतर्फ

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : सीईओंची धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अपहार, अनियमितता, कर्तव्यात कसूर, वरिष्ठांची अवहेलना या सारखे आरोप सिद्ध झालेल्या जिल्ह्यातील चार ग्रामसेवकांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी ही धडक कारवाई केली. त्यामुळे गाव प्रशासनाच्या यंत्रणेत खळबळ निर्माण झाली आहे. एम.पी. यमतकर, व्ही.ए. बेदरकर, बी.बी. सुर्ये व अनिल श्रीराम निळे अशी या ग्रामसेवकांची नावे आहेत. यमतकर हे पुसद पंचायत समिती अंतर्गत कार्यरत होते. शासकीय निधीत अपहार, अनियमितता, कर्तव्यात कसूर, प्रभार हस्तांतरण न करणे, तपासणीसाठी अभिलेखे उपलब्ध करून न देणे, वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना, मुख्यालयी न राहणे, कार्यालयीन सचोटीचे पालन न करणे, अभिलेखे उपलब्ध करून न देणे आदी ठपका या ग्रामसेवकांवर चौकशीत ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र त्यांचा एकूणच गैरकारभार सिद्ध झाल्याने व त्यात सुधारणेची चिन्हे नसल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Web Title: Four gramservice from the service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.