शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

By admin | Updated: June 15, 2014 23:46 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महिनाभराने रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांची चिंतन बैठक पार पडली. त्यात कार्यकर्त्यांचे आक्रमक रुप पाहून अखेर जिल्हाध्यक्षांना पक्षाची जिल्हा कार्यकारिणीच

लोकसभेतील पराभव : चिंतन बैठकीनंतर निर्णययवतमाळ : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महिनाभराने रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांची चिंतन बैठक पार पडली. त्यात कार्यकर्त्यांचे आक्रमक रुप पाहून अखेर जिल्हाध्यक्षांना पक्षाची जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय घ्यावा लागला. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात दुपारी १ वाजता कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला. लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून हा निर्णय घेतल्याचे व तसे पत्र प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात आल्याचे आमदार कासावार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे तर चंद्रपूर मतदारसंघातून सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे अनुक्रमे ९३ हजार आणि साडेतीन लाख मतांनी पराभूत झाले. या पराभवामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते उघडे पडले. नेत्यांनी सामान्य नागरिकच नव्हे तर मतदारांच्या समस्यांकडेही कसे दुर्लक्ष केले, याचा पाढा वाचला गेला. कार्यकर्त्यातील रोष पाहता तब्बल महिनाभर चिंतन बैठक लांबणीवर टाकली गेली. अखेर रविवारी त्याचा मुहूर्त निघाला. त्यानंतर कार्यकारिणी बरखास्त केली गेली. आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाराज कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत सामावून घेऊन डागडुजीचा प्रयत्न नेत्यांकडून होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)