शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रेलर बँकेच्या रांगेत शिरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो निंबाच्या झाडावर धडकून बँकेसमोर लागलेल्या रांगेत शिरला. यात रांगेतील सात महिला जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली.

ठळक मुद्देजोडमोहाची घटना : निंबाच्या झाडावर धडक, सात जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन यवतमाळ मार्गे जात असलेल्या ट्रेलरला जोडमोहा येथे अपघात झाला. ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो निंबाच्या झाडावर धडकून बँकेसमोर लागलेल्या रांगेत शिरला. यात रांगेतील सात महिला जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली.अरुण हरदलाल विश्वकर्मा (५०) रा. चंद्रपूर हा पांढरकवडावरून ट्रेलर (क्र.एमएच-३५ के-६६२५) घेऊन यवतमाळकडे जात होता. त्याचे जोडमोहा येथे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रेलरने रस्त्याच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाला जोरात धडक दिली. यात ते झाड जमीनदोस्त झाले. तसेच बँकेसमोर उभ्या असलेल्या दुचाकी व पानटपरीचा चुराडा झाला. शुभांगी ठाकरे (३२), श्रावण सोनोने (२१), सीताराम उईके (५५), मुक्ताबाई उन्हाळे (५५), प्रमिला व्यवहारे (५०), नानीबाई कोडापे, लक्ष्मी मेश्राम सर्व रा. बेलोरी हे जखमी झाले. हे सर्व जण बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. धावपळीत हे सात जण किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार संजय शिरभाते, जमादार राजू आडे यांनी भेट दिली.