नागापूरच्या नागरिकांचे उमरखेड पंचायत समितीसमोर उपोषण

By Admin | Updated: May 22, 2014 01:33 IST2014-05-22T01:33:27+5:302014-05-22T01:33:27+5:30

नागापूर ग्रामपंचायतीच्या व जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी

Fasting against the Ummkhed Panchayat Samiti of Nagapur citizens | नागापूरच्या नागरिकांचे उमरखेड पंचायत समितीसमोर उपोषण

नागापूरच्या नागरिकांचे उमरखेड पंचायत समितीसमोर उपोषण

उमरखेड (कुपटी) : नागापूर ग्रामपंचायतीच्या व जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी करीत येथील पंचायत समिती समोर आज चितांगराव कदम व विलास मोरे यांनी उपोषणाला प्रारंभ केला.

ग्रामपंचायतीमध्ये झालेला गैरकारभार आणि शाळा बांधकामातील अनियमितेची चौकशी करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतु गटविकास अधिकार्‍यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे नागापूर येथील नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे.

या कारभाराची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी दाखल करावी, या मागणीसाठी बुधवार २१ मे रोजी सकाळी ११ वाजतापासून पंचायत समिती समोर गावकर्‍यांच्यावतीने चितांगराव कदम यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. कुपटी येथील जिल्हा परिषद शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका माया आडे यांनी केलेल्या गैरप्रकाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सरपंच विलास मोरे यांनी केली आहे. त्यांनीही उमरखेड पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणामुळे पंचायत समितीच्या गलथन कारभाराचे धिंडवडे निघाले असून आता या प्रकरणी काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)

Web Title: Fasting against the Ummkhed Panchayat Samiti of Nagapur citizens