शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या शोधात शेतकऱ्यांची भटकंती

By admin | Updated: October 4, 2014 23:34 IST

दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आला असताना कापूस, सोयाबीन ही पिके शेतात उभी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या मजुरांची मोठ्याप्रमाणात पळवापवळी सुरू असल्याने

पुसद : दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आला असताना कापूस, सोयाबीन ही पिके शेतात उभी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या मजुरांची मोठ्याप्रमाणात पळवापवळी सुरू असल्याने पीक काढण्यासाठी लागणाऱ्या मजूरांची कधी नव्हे एवढी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी शेतकरी मजुरांच्या शोधात वणवण भटकंती करीत आहे. मजुरांची विनवणी करून व मजुरीच्या दरात वाढ करूनसुद्धा मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. भविष्यात शेती करावी की नाही, या निर्णयाप्रत शेतकरी येऊन ठेपले आहेत. शेतकऱ्यांपेक्षा शेतमजूरच सुखी असे चित्र असल्याचे शेतकरीवर्ग सांगत आहे. यावर्षी विधानसभा निवडणूक आल्याने मजुरांची चांगलीच चंगळ सुरू आहे. शेतात राबराब राबल्यानंतर ८० ते १०० रुपये रोज पडतो. परंतु एखद्या नेत्याच्या प्रचारात सहभागी झाल्यानंतर नेत्यांकडून जेवणखाण व भत्ता मिळत असल्याने मजूरवर्ग तिकडेच जात आहेत. बहुतेक शेतकरी आपली शेती मक्त्याने देण्याच्या मानसिकते दिसत आहे. बदलत्या काळानुरूप शेतातील अनेक कामे यंत्रानेच केली जात असली तरीसुद्धा कापूस वेचणे, ज्वारी, खुडणी व सोयाबीन कापणी या कामांसाठी शेतकऱ्यांना मजुरांवरच विसंबून राहावे लागते. दिवसेंदिवस शेती कामासाठी मजुंराची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांना मजूर सापडने कमी झाले आहे. शेतावर वर्षभर कामासाठी लागणाऱ्या गडी माणसांचे सालही प्रचंड वाढले आहे. आता कापूस शेतात फुटत आहे, तो वेचन्यासाठी मजूर नाही. वेचणीचा दर तीन ते चार रुपये प्रति किलो करूनही मजूर मिळेनासा झाला आहे. शहरातील मजुरांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी शहराकडे धाव घेऊन मजुरांची गयावया करून त्यांची मने वळविण्यात मजुरांना त्यांच्या घरून शेतापर्यंत नेण्याची सोय वाहनाव्दारे करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शाळेतील विद्यार्थीसुद्धा कापूस वेचणीच्या कामी लागले आहे. परंतु शाळेमध्ये प्रथम सत्र परीक्षांची तयारी सुरू असल्याने विद्यार्थीसुद्धा उपलब्ध होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत मजुरांची चांगलीच चंगळ होत असून, शेतकरी मात्र भरडल्या जात आहे. सध्या सोयाबीन काढणीवर आले असताना परतीच्या पावसाचे आगमण झाले तर शेतातील पिकांची नासाडी होऊ नये या विवंचनेत शेतकरी आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी कुटुंबासह स्वत: शेतात राबत आहेत. (तालुका प्रतिनिधी)