शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

हमीभाव अथवा ५१०० क्विंटलने कापूस खरेदी सुरू करावी, या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी चक्काजाम केले. व्यापाऱ्यांनी केवळ ४१०० ते ४२०० रुपये दराने खरेदी सुरू केल्याने शेतकरी संतापले. कापूस विक्रीसाठी आलेल्या बैलगाड्या आणि इतर प्रकारची वाहने रस्त्यावर आडवी लावण्यात आली. दुपारी बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.प्रफुल्ल मानकर, व्यापाऱ्यांच्यावतीने बाळू धुमाळ आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली.

ठळक मुद्देराळेगावात बैलगाड्या रस्त्यावर : भाव पाडून कापूस खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : व्यापाऱ्यांनी केवळ ४१०० ते ४२०० रुपये क्विंटलने कापूस खरेदी सुरू केल्याने संतप्त शेतकºयांनी शुक्रवारी रास्ता रोको केला. यामुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा चंद्रपूर-वर्धा-हिंगणघाट मार्ग बंद झाला होता. तब्बल तीन तासपर्यंत बैलबंड्या आडव्या करून रस्ता रोखण्यात आला होता. यामुळे दोन्ही बाजूने विविध प्रकारच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर ४८०० रुपये दराने खरेदी सुरू करण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.हमीभाव अथवा ५१०० क्विंटलने कापूस खरेदी सुरू करावी, या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी चक्काजाम केले. व्यापाऱ्यांनी केवळ ४१०० ते ४२०० रुपये दराने खरेदी सुरू केल्याने शेतकरी संतापले. कापूस विक्रीसाठी आलेल्या बैलगाड्या आणि इतर प्रकारची वाहने रस्त्यावर आडवी लावण्यात आली. दुपारी बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.प्रफुल्ल मानकर, व्यापाऱ्यांच्यावतीने बाळू धुमाळ आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली. ४८०० रुपये क्विंटलने खरेदी करण्याचे ठरल्यानंतर चक्काजाम मागे घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. व्यापारी शेतकऱ्यांना अडचणीत पकडत आहे. हमीभाव तर दूर कितीतरी कमी दरामध्ये कापूस खरेदी केली जात आहे. विविध कारणांमुळे आम्ही आधीच अडचणीत आलेलो आहोत. आता व्यापारी त्यात भर टाकत आहे, अशा प्रतिक्रिया महेश हिवरकर, जशा पवार, नारायण भूत, सुनील जामलाटे, मयूर पवार आदी शेतकऱ्यांनी नोंदविल्या.१५ पर्यंत खरेदी बंदजिल्ह्यात केवळ राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शुक्रवारपासून कापूस खरेदी सुरू केली. मात्र पहिल्याच दिवशी त्याला गालबोट लागल्याने ही खरेदी १५ नोव्हेंबरपर्यंत थांबविली जात असल्याचे बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती