शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:25+5:30

हमीभाव अथवा ५१०० क्विंटलने कापूस खरेदी सुरू करावी, या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी चक्काजाम केले. व्यापाऱ्यांनी केवळ ४१०० ते ४२०० रुपये दराने खरेदी सुरू केल्याने शेतकरी संतापले. कापूस विक्रीसाठी आलेल्या बैलगाड्या आणि इतर प्रकारची वाहने रस्त्यावर आडवी लावण्यात आली. दुपारी बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.प्रफुल्ल मानकर, व्यापाऱ्यांच्यावतीने बाळू धुमाळ आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली.

farmers' Stop the road | शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Next
ठळक मुद्देराळेगावात बैलगाड्या रस्त्यावर : भाव पाडून कापूस खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : व्यापाऱ्यांनी केवळ ४१०० ते ४२०० रुपये क्विंटलने कापूस खरेदी सुरू केल्याने संतप्त शेतकºयांनी शुक्रवारी रास्ता रोको केला. यामुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा चंद्रपूर-वर्धा-हिंगणघाट मार्ग बंद झाला होता. तब्बल तीन तासपर्यंत बैलबंड्या आडव्या करून रस्ता रोखण्यात आला होता. यामुळे दोन्ही बाजूने विविध प्रकारच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर ४८०० रुपये दराने खरेदी सुरू करण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
हमीभाव अथवा ५१०० क्विंटलने कापूस खरेदी सुरू करावी, या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी चक्काजाम केले. व्यापाऱ्यांनी केवळ ४१०० ते ४२०० रुपये दराने खरेदी सुरू केल्याने शेतकरी संतापले. कापूस विक्रीसाठी आलेल्या बैलगाड्या आणि इतर प्रकारची वाहने रस्त्यावर आडवी लावण्यात आली. दुपारी बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.प्रफुल्ल मानकर, व्यापाऱ्यांच्यावतीने बाळू धुमाळ आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली. ४८०० रुपये क्विंटलने खरेदी करण्याचे ठरल्यानंतर चक्काजाम मागे घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. व्यापारी शेतकऱ्यांना अडचणीत पकडत आहे. हमीभाव तर दूर कितीतरी कमी दरामध्ये कापूस खरेदी केली जात आहे. विविध कारणांमुळे आम्ही आधीच अडचणीत आलेलो आहोत. आता व्यापारी त्यात भर टाकत आहे, अशा प्रतिक्रिया महेश हिवरकर, जशा पवार, नारायण भूत, सुनील जामलाटे, मयूर पवार आदी शेतकऱ्यांनी नोंदविल्या.

१५ पर्यंत खरेदी बंद
जिल्ह्यात केवळ राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शुक्रवारपासून कापूस खरेदी सुरू केली. मात्र पहिल्याच दिवशी त्याला गालबोट लागल्याने ही खरेदी १५ नोव्हेंबरपर्यंत थांबविली जात असल्याचे बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: farmers' Stop the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.