शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावात शेतकऱ्यांची दारोदारी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

कोरोनाचे संकट कोसळल्याने १७ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन झाले. त्यामुळे शेतातील भाजीपाला एक महिन्यापासून शेतातच पडून आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढविण्यात आले आहे आणि पुढे काय परिस्थिती राहील, हे आज कोणी सांगू शकत नाही.

ठळक मुद्देशेतमालाचेही नुकसान : कवडीमोल भावात केली जातेयं भाजीपाल्याची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने घरोघरी जाऊन शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यांना कवडीमोल भावात आपला शेतमाल विकावा लागत आहे.लॉकडाऊन असल्याने सर्व बाजारपेठा बंद आहे. उन्हाळ्यात भाजीपाला, टरबूज, डांगुर आदी पिकांना मिळणारा दर पाहता या पिकांची तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. परंतु अचानक कोरोनाचे संकट कोसळल्याने १७ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन झाले. त्यामुळे शेतातील भाजीपाला एक महिन्यापासून शेतातच पडून आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढविण्यात आले आहे आणि पुढे काय परिस्थिती राहील, हे आज कोणी सांगू शकत नाही. भाजीपाला पिकाची होत चाललेली दैना अवस्था पाहता आता थेट शेतकरी आॅटोने नागरिकांच्या घरोघरी जाऊन कवडीमोल दरात भाजीपाल्याची विक्री करित आहे. यात पालक, टमाटे, वांगे, चवळी, कांदे, कोथिंबीर आदी भाजीपाल्यांचा समावेश आहे.तर दुसरीकडे तुर, हरभरा, गहू, ज्वारी, मुंग, आदी पिके बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांच्याच घरात पडून आहे. त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी आता कडधान्य ही नागरिकांच्या घरी नेऊन थेट विक्री सुरू केली आहे. याठिकाणीसुद्धा शेतकऱ्यांना कमी दरात ही कडधान्य विकावे लागत आहे. शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान पाहता शेतकऱ्यांकडील शेतमाल विक्रीची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.कृषी विभागाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा आधारकृषी विभागाने शेतकºयांचे अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप शेती सल्ला देण्यासाठी बनविले आहे. आता याच ग्रुपचा वापर शेतकºयांना माल विक्रीसाठी फायदेशीर ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे कांदा, भाजीपाला, गहू, ज्वारी, हरभरा, मिरची आदी वस्तू विकायच्या आहे. हे शेतकरी ग्रुपवर जो माल विकायचा असेल त्याचा फोटो आणि किमंत टाकतात आणि त्याच ग्रुपवर मालाची आर्डर घेऊन घरपोच माल पोहोचवित आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या