शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

शेतकरी आत्महत्या म्हणजे राष्ट्रीय आपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 05:00 IST

चिलगव्हाण येथील साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्याने ३५ वर्षांपूर्वी पत्नी मालती, मुलगा भगवान आणि सारीका, मंगला व विश्रांती या मुलींसह सहकुटुंब आत्महत्या केली होती. देशभराच्या वृत्तपत्रांमधून गाजलेली ही पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. त्यानंतर ३५ वर्षांत लाखो शेतकऱ्यांनी मरण कवटाळले. हे शासकीय व्यवस्थेने केलेले खूनच आहेत, असा संताप अमर हबीब यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देअमर हबीब यांचे प्रतिपादन, चिलगव्हाण येथे अन्नत्याग आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : शेतकरी आत्महत्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. ही राष्ट्रीय आपत्ती असून शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे रद्द करणे हे आपल्या सर्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे प्रतिपादन शेती प्रश्नांचे अभ्यासक तथा अन्नत्याग आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले.तालुक्यातील चिलगव्हाण येथे शुक्रवारी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनात त्यांनी सरकारच्या शेतीविरोधी धोरणावर जोरदार हल्ला केला. चिलगव्हाण येथील साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्याने ३५ वर्षांपूर्वी पत्नी मालती, मुलगा भगवान आणि सारीका, मंगला व विश्रांती या मुलींसह सहकुटुंब आत्महत्या केली होती. देशभराच्या वृत्तपत्रांमधून गाजलेली ही पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. त्यानंतर ३५ वर्षांत लाखो शेतकऱ्यांनी मरण कवटाळले. हे शासकीय व्यवस्थेने केलेले खूनच आहेत, असा संताप अमर हबीब यांनी व्यक्त केला.साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त किसान पुत्रांनी चिलगव्हाण येथे शुक्रवारी दिवसभर उपवास करून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. समारोप करताना मशाल पेटवून आंदोलनाची धग कायम ठेवण्याचे आवाहन हबीब यांनी केले. यावेळी उमरखेडचे आमदार नामदेव ससाने, अनंत देशपांडे, संदीप धावडे, प्रमोद जाधव, हनुमंत पाटील, अविनाश पोळकट, पंकजपाल महाराज, संतोष अरसोड, पुरुषोत्तम गावंडे, प्रेम हनवते डॉ. संदीप शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

चिलगव्हाण येथे स्मारक उभारणारशेतकरी आत्महत्यांकडे समाजाचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साहेबराव करपे कुटुंबियांचे गाव असलेल्या चिलगव्हाण येथे स्मारक उभे राहावे, यासाठी किसानपुत्र आंदोलन सर्व शक्तीनिशी सहकार्य करेल, अशी घोषणा अमर हबीब यांनी केली. तसेच केंद्राने पारित केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना किसानपुत्र आंदोलनाचा विरोध नाही, पण सीलिंग, आवश्यक वस्तू, हे जीवघेणे कायदे समूळ रद्द करणे जास्त गरजेचे आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचा लढा सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आत्महत्याग्रस्तांसाठी नव्या संस्थेचा संकल्प आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी व तमाम शेतकऱ्यांना नरभक्षी कायद्यांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी नवीन संस्था गठित करीत असल्याचे अमर हबीब यांनी सांगितले. ही संस्था शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झटत राहील, अशी घोषणा किसानपुत्र आंदोलनाच्यावतीने करण्यात आली. संस्थेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल व आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक मदतीसाठी संवैधानिक लढा उभा केला जाईल. 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या