शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषदेच्या ‘संधी’वर डोळा

By admin | Updated: October 7, 2015 02:45 IST

नगरपंचायतीच्या नगरसेवकांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानाची ‘संधी’ मिळणार असल्याने या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे.

नगरपंचायत निवडणूक : आॅनलाईन नामांकनासाठी धडपड, इच्छुकांची भाऊगर्दी यवतमाळ : नगरपंचायतीच्या नगरसेवकांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानाची ‘संधी’ मिळणार असल्याने या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. नामांकन दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना यामुळेच राजकीय पक्षांना आपले उमेदवार निश्चित करण्यात अडचण येत आहे. तर दुसरीकडे नामांकनासाठी आॅनलाईन पद्धत असल्याने अनेकांची ‘लिंक’ फेल होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, झरी आणि महागाव येथे नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. ८ आॅक्टोबर ही नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. राजकीय पक्षांकडे तिकीट मागणाऱ्या उमेदवारांची मोठी गर्दीही दिसत आहे. मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवारांची अधिकृत नावे जाहीर केली नाही. त्याला कारणही तसेच आहे. नगरपंचायतीतून निवडणूक येणाऱ्या नगरसेवकाला विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाची संधी आहे. जिल्ह्यात आॅक्टोबर २०१६ मध्ये म्हणजेच वर्षभरानंतर विधान परिषदेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक ‘कॅश’ करण्यासाठी आता नगरपंचायतीचा आधार घेतला जात आहे. यापूर्वी दहा नगरपरिषदेतील २४९ नगरसेवक आणि ६२ जिल्हा परिषद सदस्य विधानपरिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी मतदान करीत होते. आता त्यात १०२ मतदारांची भर पडणार आहे. सहा नगरपंचायतीच्या सदस्यांना हा अधिकार असल्याने खरी चुरस आतापासूनच वाढली आहे.काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी सत्तेपासून दूर आहे. पाच वर्ष कुठलेच पद नसणे हे त्यांच्यासाठी कठीण ठरणारे आहे. त्यामुळेच नगरपंचायतीच्या माध्यमातून संभाव्य विधान परिषदेचे गणित जुळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी आपल्या मर्जीतील सदस्यच नगरपंचायतीत जावे अशी व्युहरचना आखली जात आहे. नगरपंचायतीतील गठ्ठा १०२ मते आपल्या बाजूने राहिल्यास विधान परिषदेचा मार्ग सुखकर होणार आहे. त्यामुळेच अनेकांनी या निवडणुकीच्या माध्यमातून भविष्यातील राजकीय गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)विधानसभेप्रमाणेच द्यावे लागणार विवरण नगरपंचायतीसाठी नामांकन दाखल करताना स्वतंत्र विवरण पत्र भरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. यापूर्वी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठीच ही पद्धत राबविली जात होती. आता मात्र नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनासुद्धा ११ पानाचे विवरण पत्र भरुन द्यावे लागणार आहे. यात बँक खाते, आर्थिक उत्पन्न व त्याचे स्रोत, न्यायालयीन खटले, दाखल गुन्हे यासह संपूर्ण वैयक्तिक माहिती उमेदवारांना नमूद करावी लागणार आहे. आॅनलाईन पद्धतीचा फटका राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींप्रमाणेच नगरपंचायतीसाठीसुद्धा आॅनलाईन नामांकन दाखल करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र आॅनलाईन अर्ज भरताना लिंक फेल होण्याचे प्रकार घडत आहे. अनेक इच्छुक उमेदवार साईट ओपन होत नसल्याचे सांगत आहे. तर काहींनी सायबर कॅफेवर अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाने यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक तहसील स्तरावर मदत केंद्र उभारण्यात आले आहे.