शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

उधारीच्या पैशावरून खून झाल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

आसुटकर यांनी वणी पोलिसांना घरातून दुर्गंधी येत असल्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, घरात सतीशचे प्रेत आढळून आले. यावेळी करण कश्यप घरातून बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी युक्ती वापरून करणशी मोबाईलवरून संपर्क केला असता, आपण घुग्घूस येथे असल्याची बतावणी केली. मात्र त्याचे मोबाईल लोकेशन नागपुरात होते.

ठळक मुद्देवणीतील घटना : मारेकरी युवक चार तासात नागपुरातून जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : उधारीच्या पैशावरून झालेल्या वादात मित्रानेच मित्राचा मारहाण करत गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली.सतीश नामदेव देवासे (२५) रा.तुकूम (चंद्रपूर) असे मृताचे नाव आहे. वणी येथील रवीनगर भागात राहणाऱ्या अनिल आसूटकर यांच्या घरी किरायाने राहणारा युवक करण संतोष कश्यप याने रविवारी रात्री स्वत:च्या खोलीत दारू पाजून सतीशला मारहाण करीत गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी करण कश्यप पे्रताची विल्हेवाट लावण्यासाठी धडपड करीत असताना मदत मिळवण्यासाठी नागपुरात पोहोचला. मात्र वणी पोलिसांनी अवघ्या चार तासात मोबाईलच्या लोकेशनवरून त्याला मंगळवारी रात्री नागपुरात बेड्या ठोकल्या. मृत सतीश देवासे व आरोपी करण कश्यप हे एका फायनान्स कंपनीत नोकरीला होते. तेथेच त्यांची मैत्री झाली. यादरम्यान करणने सतीशजवळून ६० हजार रूपये उसणवारीने घेतले होते. ते परत करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सतीशने करणकडे तगादा लावला होता. रविवारी रात्री करणने सतीशला वणी येथे बोलावून घेतले. रात्री रविनगरमधील आपल्या रूमवर नेऊन त्याला दारू पाजली. त्यानंतर दोघात पैशावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर सतीशच्या खुनात झाले. घटनेनंतर करणने पुरावा नष्ट करण्यासाठी सतीशचे प्रेत प्लास्टिकच्या सिमेंटच्या पोत्यात बांधले. दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारनंतर घरातून उग्र वास येत असल्याने घरमालक आसुटकर यांनी करणला याबाबत विचारणा केली, तेव्हा घरात घूस मरण पावल्याचे त्याने सांगितले. मंगळवारी करणच्या खोलीतून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येऊ लागल्याने अनिल आसुटकर यांचा संशय बळावला. नंतर आसुटकर यांनी वणी पोलिसांना घरातून दुर्गंधी येत असल्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, घरात सतीशचे प्रेत आढळून आले. यावेळी करण कश्यप घरातून बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी युक्ती वापरून करणशी मोबाईलवरून संपर्क केला असता, आपण घुग्घूस येथे असल्याची बतावणी केली. मात्र त्याचे मोबाईल लोकेशन नागपुरात होते. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक हे डी.बी.पथकासह नागपूरकडे रवाना झाले व तेथे जाऊन आरोपीला जेरबंद केले. आरोपी करण कश्यप हा मुळचा वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी आहे. याप्रकरणी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला बुधवारी न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे, डी.बी.पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, शेखर वांढरे, वासुदेव नारनवरे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, अविनाश बानकर, शेख ईकबाल, दीपक वांड्रसवार, अमित पोयाम, पंकज उंबरकर आदींनी केली.मारेकरी आयपीएल सट्ट्यात कर्जबाजारीमारेकरी करण कश्यप याला आयपीएल सट्ट्याचा नाद होता. या नादात तो प्रचंड कर्जबाजारी झाला. त्याच्यावर सध्यास्थितीत तीन लाखांचे कर्ज असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे त्याने सट्टा लावण्यासाठी वडिलांच्या नावे असलेली काही लाखांची आरडीदेखील विड्रॉल केल्याचे सांगितले जाते. आर्वी परिसरात त्याला ‘आयपीएल सट्टा’ या नावानेच ओळखले जाते. कर्जबाजारीपणातूनच त्याने गाव सोडले होते.

टॅग्स :Murderखून