शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

पावसाचे महिने संपले तरी जिल्ह्यात निम्माच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 6:00 AM

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ६१ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. काही मोजके प्रकल्प याला अपवाद आहे. यामुळे ओलितावर मर्यादा येणार आहे. पूस, बेंबळा, नवरगाव, सायखेडा, बोरगाव, निळोना आणि चापडोह प्रकल्प निर्धारित क्षमतेच्या १०० टक्के भरले. मात्र इतर १०७ प्रकल्पांमध्ये केवळ ६१ टक्के साठा झाला आहे.

ठळक मुद्देकेवळ ५२ टक्के बरसला ।आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या महिन्यात रिमझीम पाऊस जिल्ह्यात बरसला. परिणामी सप्टेंबर मध्यापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५२ टक्के पाऊस झाला. आता पावसाळा संपत असून येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा धोका वर्तविला जात आहे.जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ६१ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. काही मोजके प्रकल्प याला अपवाद आहे. यामुळे ओलितावर मर्यादा येणार आहे. पूस, बेंबळा, नवरगाव, सायखेडा, बोरगाव, निळोना आणि चापडोह प्रकल्प निर्धारित क्षमतेच्या १०० टक्के भरले. मात्र इतर १०७ प्रकल्पांमध्ये केवळ ६१ टक्के साठा झाला आहे. तर दुसरीकडे सततच्या ढगाळ वातावरणाने कापूस पिकावर अळी, तुडतुडे आणि रोगांचे प्रमाण वाढले आहे. दररोज पावसाळी वातावरण कायम असले तरी जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प तुडुंब भरण्याइतका पाऊस अद्यापही झालेला नाही. उलट सततच्या पावसाळी वातावरणामुळे शेत पिकांवर रोगराई पसरत आहे. तर रुग्णालयातही साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहे.तालुकानिहाय पावसाचा टक्कायवतमाळ ३९.७०बाभूळगाव ५५.७९कळंब ४६.९०आर्णी ७१.९२दारव्हा ४७.७९दिग्रस ४८.६७नेर ५३.२६पुसद ६३.६८उमरखेड ५५.३०महागाव ५६.३८केळापूर ४९.६८घाटंजी ४६.१५राळेगाव ४६.८३वणी ६१.३०मारेगाव ५५.७७झरीजामणी ४८.६६एकूण ५२.६८

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीकपात