शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांच्या परवानगीनंतरच बाहेरच्यांना एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोरोनाचा विषाणू बाहेर ठिकाणावरून येतो. त्याला रोखण्यासाठी देशपातळीवर बंदी घातल्या गेली आहे. आता गावपातळीवर ...

ठळक मुद्देरोहटेक, जामडोह नागरिकांनी केली नाकाबंदी : कोरोनाच्या भीतीने गावाच्या हिताचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा विषाणू बाहेर ठिकाणावरून येतो. त्याला रोखण्यासाठी देशपातळीवर बंदी घातल्या गेली आहे. आता गावपातळीवर ग्रामस्थांनी गावबंदी घातली आहे. यातून गाव सुरक्षित रहावे हा नागरिकांचा मूळ उद्देश आहे.पुणे-मुंबईत रोजगार आणि शिक्षणासाठी वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांचे लोंढे गावखेड्याकडे वळत आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या बसफेऱ्या रोखल्या आहे. असे असले तरी बाहेर जिल्ह्यातील व्यक्ती खासगी वाहनाच्या मदतीने गावखेड्यात प्रवेश करीत आहे. दररोज बाहेर जिल्ह्यातील नागरिकांचा आकडा वाढत आहे. यामुळे गावकरी चांगलेच धास्तावले आहे.विदेशातून आलेल्या व्यक्ती आणि पुणे-मुंबईतील व्यक्ती यांच्यामुळेच कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचा समज गावकऱ्यांचा झाला आहे. याशिवाय इतर कुठला व्यक्ती कोरोनाचा विषाणू बाधित झाला असेल हे कुणालाही सांगत येत नाही. कोरोनाची बाधा झालेला व्यक्ती १४ दिवसानंतरच लक्षणे दाखवितो. तोपर्यंत अनेकांना त्याची बाधा होते. हा प्रकार थांबविण्यासाठी गावकऱ्यांनी बाहेर ठिकाणावरून येणाऱ्या व्यक्तींना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी डोर्ली गावात या निर्णयाची अंमलबजावणी झाली. बुधवारी रोहटेक आणि जामडोह गावामध्ये नागरिकांनी अशाच प्रकारे बाहेर ठिकाणावरुन येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी केली आहे. कोरोनाची बाधा रोखण्यासाठी हा निर्णय या गावातील व्यक्तींनी घेतला आहे. जामडोहमध्ये मुख्य रस्त्यावर दोर बांधून बाहेर ठिकाणावरून येणारी वाहने थांबविण्यात येत आहे. तर रोहटेकमध्ये नागरिकांनी रस्त्यांवर दगडांचा थर लावून वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. रस्त्यावर तशा स्वरूपाचा संदेशही लिहिण्यात आला आहे. यामुळे गावाबाहेर पडलेल्या आणि परजिल्ह्यात वास्तव्याला असणाºया व्यक्तींना आता या गावांमध्ये प्रवेश करताना गावकºयांची खात्री झाल्यानंतरच गावात प्रवेश मिळणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgram panchayatग्राम पंचायत