शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली संमेलनातील आणखी आठ संशयित रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST

२४ तासात १४ कोरोना संशयित ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून यापूर्वी ३९ कोरोना संशयितांचे थ्रोट स्वॅब नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी तिघांचा तपासणी अहवाल आला असून तो निगेटीव्ह आहे. या तीनही जणांना मेडिकलच्या विलगीकरण कक्षातून घरी पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी ताब्यात घेतले : तिघांचे अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना संशयिताचा आकडा सातत्याने वाढत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आता ५६ कोरोना संशयित रुग्ण दाखल आहेत. यवतमाळ शहरातील तायडेनगरातून रविवारी रात्री आठ जणांना तर सोमवारी दुपारी तालुक्यातील सावरगाव येथील दोघांना, महागाव तालुक्यातून चौघांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. २४ तासात १४ कोरोना संशयित ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयातून यापूर्वी ३९ कोरोना संशयितांचे थ्रोट स्वॅब नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी तिघांचा तपासणी अहवाल आला असून तो निगेटीव्ह आहे. या तीनही जणांना मेडिकलच्या विलगीकरण कक्षातून घरी पाठविण्यात आले आहे.नव्याने कोरोना संशयित रुग्ण दाखल झाल्याने १२ जणांचे थ्रोट स्वॅब नागपूरला तपासणीकरिता पाठविले आहे. पूर्वीचे ३६ व नव्याने पाठविलेले १२ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. सध्या मेडिलकच्या विलगीकरण कक्षात असलेल्या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात येते. कोरोना विषाणूचा संसर्ग झाला की नाही हे मात्र थ्रोट स्वॅबच्या तपासणी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. गेल्या काही दिवसात शहरासह जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सुदैवाने अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. यापूर्वीच्या तीन रुग्णांवर मेडिकलच्या चमूने यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठविले आहे. हे तीनही व्यक्ती होम क्वारंटाईन आहे.२०० कोरोना पीपीई किटस् प्राप्तशासकीय रुग्णालयात कोरोना संसर्ग असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २३० बेडचे स्वतंत्र रुग्णालय उभारले आहे. आता तेथे उपचार करण्यासाठी आवश्यक साधनेही उपलब्ध होत आहे. दोन दिवसापूर्वी नागपूर येथून २०० पीपीई (पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्वीपमेंट) किटस् प्राप्त झाल्या आहेत. रुग्णालयातील डॉक्टर व नर्सेस यांना कोरोना संशयितांवर उपचार करताना, त्यांचे थ्रोट स्वॅब घेताना या किटस्चा उपयोग होत आहे. किटस्मध्ये अ‍ॅप्रन, गॉगल, मास्क, ग्लोज्, बुट कव्हर याचा समावेश आहे. सुरक्षित राहून उपचार करता येण्यासाठी या किटस् अत्यावश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या