शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

भीसी व्यवसायात आठ कोटीने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

भीसीच्या या व्यवसायात आठ कोटी रुपयांचा घोळ घातला गेला आहे. भीसीची ही रक्कम त्यातील सदस्य असलेल्या व्यापाऱ्यांना देणे टाळले जात आहे. या फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांची नावेही पुढे आली आहेत. त्यामुळे बुडलेल्या या आठ कोटींच्या रकमेच्या वसुलीसाठी आता या भीसी व्यवसायातही गुन्हेगारांचा शिरकाव होण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । जाजू चौक मुख्य केंद्र, भागीदारीतील व्यवसाय, किराणा व्यापारी सूत्रधार

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील व्यापाऱ्यांची दरमाह कोट्यवधी रुपयांची भीसी चालविली जात असून त्यात व्यापाऱ्यांची आठ कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.यवतमाळ शहरातील व्यापारी, व्यावसायिक भीसीमध्ये पैसा गुंतवितात. या भीसीचे मुख्य केंद्र हे गोदनी रोडवरील जाजू चौकात आहे. भागीदारीतून हा व्यवसाय चालविला जात असून एक किराणा व्यापारी याचे सूत्रधार आहेत. दरदिवशी १५ लाख ते दीड कोटी रुपयापर्यंत ही भीसी चालते. छोट्याशा कार्यालयात भीसीची ही सर्कस चालविली जाते. दररोज तीन ते चार भीसी उघडल्या जातात. या कार्यालयापुढे पार्किंगसाठी जागा नसल्याने तेथे अनेकदा भांडणेही होतात. लिलाव पद्धतीने ही भीसी काढली जाते. यवतमाळ शहरातील अनेक व्यापारी या भीसीचे घटक आहेत. या भीसीचे ‘मास्टर मार्इंड’ मात्र वेगळेच आहे. भीसी व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी अधिकृत रेकॉर्डवर हा सर्व व्यवहार झिरो आहे. अनधिकृतरीत्या रजिस्टरवर भीसीचे हे आकडे नोंदविले जातात. प्राप्तीकर खात्यासाठी ही भीसी आव्हान ठरली आहे.भीसीच्या या व्यवसायात आठ कोटी रुपयांचा घोळ घातला गेला आहे. भीसीची ही रक्कम त्यातील सदस्य असलेल्या व्यापाºयांना देणे टाळले जात आहे. या फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांची नावेही पुढे आली आहेत. त्यामुळे बुडलेल्या या आठ कोटींच्या रकमेच्या वसुलीसाठी आता या भीसी व्यवसायातही गुन्हेगारांचा शिरकाव होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रधाराकडे व्यापाऱ्याने पैशाची मागणी केल्यास उलट त्यालाच धमकाविण्यात येत असल्याच्याही तक्रारी आहेत.फायनान्सर कोण ?व्यापारी वर्ग एकीकडे मंदीची लाट आहे, ग्राहकी नाही, व्यवसाय ठप्प आहे असे सांगत असताना त्यांच्याकडे भीसीसाठी मासिक चार ते पाच लाखांची रक्कम येते कोठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतविला जात असण्याची शक्यता आहे. यातील नेमके फायनान्सर कोण ? हे शोधण्याचे प्राप्तीकर खात्यापुढे आव्हान आहे. या व्यवसायात एकाच व्यक्तीच्या तब्बल प्रत्येकी एक लाखाच्या पाच ते दहा भीसी असण्याचीही अनेक उदाहरणे आहेत.

टॅग्स :businessव्यवसाय