लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :विदर्भ नेत्र परिषदेच्या वर्षांच्या सुवर्णमहोत्सवी ५० वर्षानिमित्त ५१ वे अध्यक्ष म्हणून बुलढाण्याचे विख्यात नेत्रशल्यचिकित्सक डॉ. शोन चिंचोले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा यवतमाळ येथे पार पडला.
अखिल भारतीय नेत्र परिषदेच्या सायंटिफिक कमिटीच्या चेअरमन डॉ. प्रा. नम्रता शर्मा यांच्या हस्ते पदग्रहण पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री प्रा. डॉ. टी. पी. लहाने, यवतमाळ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता, डॉ. प्रा. रागिणी पारेख तसेच विदर्भातील विविध जिल्ह्यांतील अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विदर्भ नेत्र परिषदेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा स्व. डॉ. गंदेवार ओरिएशन अवॉर्ड यंदा डॉ. हेमनशू मटालिया यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. विरल शहा, सेक्रेटरी डॉ. शमिक मुकदम आणि कोषाध्यक्ष डॉ. दळणकर यांनी आपला पदभार नवनिर्वाचित कार्यकारिणीकडे सुपूर्द केला.
नवीन अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले यांनी विदर्भातील नेत्रसेवा अधिक सक्षम आधुनिक, व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यवतमाळ येथील नेत्र परिषदेच्या अध्यक्षा डॉ. बाहिती मॅडम, डॉ. रेवणवार आणि डॉ. सुबोध पुरोहित यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.
नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी :
- अध्यक्ष :डॉ. शोन चिंचोले, नियुक्त अध्यक्ष २०२७-डॉ. अभिजित पाटील, उपाध्यक्ष-डॉ. अतुल काढणे, सचिव-डॉ. सुबोध पुरोहित, कोषाध्यक्ष-डॉ. शामिक आंबटकर, सहसचिव-डॉ. सौरभ मुंदडा, चेअरमन (सायंटिफिक कमिटी) डॉ. राहुल तिवारी, सह चेअरमन डॉ. नेहा देशपांडे,
- सदस्य: डॉ. नवीन सोनी, डॉ. रोहिणी जुनेजा, डॉ. निखिल कुंडुरवार, कार्यकारी समिती
- सदस्य : डॉ. शुभम मालपाणी (अकोला), डॉ. मुर्तुजा हुसेन (अकोला), डॉ. आयुष सांगोळे (अमरावती), डॉ. राधिका लोखंडे (अमरावती), डॉ. सोनल आंबटकर (नागपूर), डॉ. अमृता वैरागडे (नागपूर), डॉ. प्रतिमा विश्वकर्मा (नागपूर), डॉ. अपर्णा गुप्ता (गोंदिया), डॉ. प्रफुल्ल डाके (बुलढाणा), डॉ. स्मिता चव्हाण (यवतमाळ), पर्यवेक्षक समिती सदस्य : डॉ. शुभांगी भावे, डॉ. धनंजय मोडक, डॉ. दिलीप जोगनपुत्रा, डॉ. दीपक बत्रा, डॉ. गोपाल अरोरा, डॉ. अनिल हरवानी, डॉ. अनुराधा राठोड, डॉ. तोटे यांचा समावेश आहे.
Web Summary : Dr. Shon Chinchole assumes presidency of Vidarbha Netra Parishad. The golden jubilee ceremony included the induction of new office bearers. Focus on modernizing eye care accessibility across Vidarbha marked the event.
Web Summary : डॉ. शोन चिंचोले ने विदर्भ नेत्र परिषद के अध्यक्ष का पद संभाला। स्वर्ण जयंती समारोह में नए पदाधिकारियों का पदभार ग्रहण हुआ। विदर्भ में आधुनिक नेत्र देखभाल को सुलभ बनाने पर जोर दिया गया।