शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक नोकरभरतीची सुनावणी पुन्हा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

सोमवारी नागपूर उच्च न्यायालयात सुनावणी होऊ घातली होती. परंतु एका पक्षकाराला नोटीस जारी न झाल्याने ही सुनावणी आता पुढील दोन आठवड्यानंतर होणार आहे. १४७ पदांची ही भरती समांतर आरक्षणाच्या मागणीमुळे वांद्यात सापडली आहे. ‘तारीख पे तारीख’ सुरू असल्याने या भरतीत ‘अ‍ॅप्रोच’ झालेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक व त्यांच्या पालकांचा संयम संपतो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४७ पदांच्या नोकरभरतीत समांतर आरक्षण लागू करण्यासंबंधी नागपूर उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी पुढील दोन आठवडे लांबणीवर पडली आहे.सोमवारी नागपूर उच्च न्यायालयात सुनावणी होऊ घातली होती. परंतु एका पक्षकाराला नोटीस जारी न झाल्याने ही सुनावणी आता पुढील दोन आठवड्यानंतर होणार आहे. १४७ पदांची ही भरती समांतर आरक्षणाच्या मागणीमुळे वांद्यात सापडली आहे. ‘तारीख पे तारीख’ सुरू असल्याने या भरतीत ‘अ‍ॅप्रोच’ झालेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक व त्यांच्या पालकांचा संयम संपतो आहे. एकूणच घोळ लक्षात घेता ही भरती नव्याने घ्यावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. या भरतीतील ४३ पदांना समांतर आरक्षण लागू होण्याची शक्यता आहे. त्यात १२ पदे शिपायाची तर ३१ पदे लिपिकाची राहू शकतात. आता बँकेचे संचालक मंडळ या भरतीबाबत नेमके काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. बँकेने स्वत: या प्रकरणात समांतर आरक्षण लागू करून नव्याने भरती घेण्यासंबंधी शपथपत्र दिल्यास पुढील भरतीचा मार्ग सुकर होऊ शकतो, असे सहकार क्षेत्रात मानले जात आहे.विभागीय सहनिबंधकाची भूमिका संशयास्पदभरती वादात अडकली असताना अमरावतीचे विभागीय सहनिबंधक राजेश दाभेराव यांची भूमिका मात्र सुरूवातीपासूनच संशयास्पद राहिली आहे. निबंधक असूनही त्यांनी बँकेला भरतीबाबत योग्य दिशा दाखविली नसल्याचा आरोप संचालकांमधूनच होऊ लागला आहे. सहनिबंधकांनी परस्पर दिलेल्या शपथपत्रामुळे बँकेची भरती कायद्याच्या कचाट्यात अडकल्याची ओरडही ऐकायला मिळते आहे.

टॅग्स :bankबँक