शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत कर्ज वाटप करा

By admin | Updated: May 29, 2016 02:35 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांनी १५ जूनपर्यंत पीक कर्जाचे वाटप करावे, असे न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल,

किशोर तिवारी : उमरखेड पंचायत समितीमधील बैठकीत फौजदारी कारवाईची तंबीउमरखेड : तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांनी १५ जूनपर्यंत पीक कर्जाचे वाटप करावे, असे न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिला. पीक कर्ज वाटपासंदर्भात पंचायत समितीच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी तिवारी बोलत होते. बैठकीला आमदार राजेंद्र नजरधने, तहसीलदार भगवान कांबळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी तसेच सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बँकेने केलेल्या कर्ज वाटपाच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. बँकांनी खूप कमी प्रमाणात कर्ज वाटप केल्याचे यावेळी उघड झाले. काही शेतकरी तर गेल्या अनेक दिवसांपासून पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारत आहे. तरीही त्यांना कर्ज मिळाले नाही, अशी अनेक प्रकरणे पुढे आली. त्यामुळे किशोर तिवारी चांगलेच भडकले. त्यांनी सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कर्ज पुरवठा करणे हे बँकेचे कर्तव्य असून त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने घेतली आहे. असे असतानाही तुम्ही कर्ज वाटप का करीत नाही, अशा शब्दात तिवारी यांनी बँक प्रतिनिधींची कानउघाडणी केली. उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत कर्ज पुरवठा झालाच पाहिजे, अन्यथा फौजदारी कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला बँकेचे जे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित नसतील त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्याचे आदेश तहसीलदार भगवान कांबळे यांंना तिवारी यांनी दिले. फौजदारी कारवाई करण्याच्या इशाऱ्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. मात्र तिवारी यांचा इशारा प्रत्यक्षात उतरणार का हे १५ जूननंतरच स्पष्ट होणार आहे. (शहर प्रतिनिधी)