शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूती वॉर्डात महिलेची अवहेलना

By admin | Updated: May 27, 2014 01:11 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती वॉर्ड हा येथील कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीमुळे नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. रात्री ११.३० वाजता प्रसूतीसाठी आलेल्या

 ‘मेडिकल’मधील प्रकार : बालक गंभीर, दोषींवर कारवाईची मागणी

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती वॉर्ड हा येथील कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीमुळे नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. रात्री ११.३० वाजता प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला चक्क एक तास तडफडत ठेवून नंतर उपचारासाठी दाखल करून घेतले. दोन दिवस उपचार केल्यानंतर त्या महिलेला अक्षरश: हाकलून देण्यात आले. या प्रकरणी नातेवाईकांनी अधीष्ठात्यांकडे तक्रार केली आहे. नेर तालुक्यातील सिंदखेड येथील पपिता जगदीश राठोड या महिलेला प्रसवकळा सुरू असताना २१ मे रोजी रात्री ११.३० वाजता शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या प्रसूती विभागातील कर्मचार्‍यांनी या महिलेला वॉर्डात दाखल करून घेतले नाही. तिच्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यानंतर रात्री १२ वाजता दाखल करून घेतले. एवढ्या रात्री उपचारासाठी औषधी लागत असल्याने नातेवाईकांना वारंवार एका खासगी रुग्णालयात पाठविले. प्रसूतीदरम्यान हयगय केल्याने बाळाची प्रकृती गंभीर झाली. अशा स्थितीत २३ मे रोजी बाळ व बाळंतीणीला रजा न देता गंभीर अवस्थेत रुग्णालयातून हाकलून दिले. याबाबत दाद मागितली असता सर्वच कर्मचार्‍यांनी उद्धटपणाची वागणूक देत कुठेही जा, अशा शब्दात दरडावून हाकलून दिले, अशी तक्रार वसंत सवाई राठोड यांनी अधीष्ठाता डॉ.आनंद डोंगरे यांच्याकडे केली आहे. आर्थिक परिस्थिती नसतानाही बाळाची प्रकृती गंभीर असल्याने शेवटी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रसूती विभागात रुग्णांना योग्य उपचार व वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहे. प्रसूतीदरम्यान माता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. या संदर्भात राज्य मानवी हक्क आयोगाकडे प्रकरण दाखल असतानाही वागणुकीत कोणताच बदल झालेला दिसत नाही. रुग्णालय प्रशासनाकडून केवळ थातूरमातूर चौकशी करून प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला जातो. येथील प्रसूती विभाग आणि बालरोग विभागाचा कारभार महिला व बालकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येते. या बाबत वरिष्ठांसह तेथील कार्यरत अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी दोषी आहे. त्यानंतरही परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच रुग्णांसोबत चुकीचा व्यवहार करण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)