शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

२०२० मध्ये जिल्हा परिषदेत तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रशासकीय आणि विनंतीनुसार अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यापैकी विनंती बदल्यावाले बहुतांश कर्मचारी नवीन विभागात रुजू झाले. मात्र प्रशासकीय बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्याच विभागात मुक्काम ठोकला. काही विभागांमध्ये असे अनेक कर्मचारी ठाण मांडून बसले आहे. त्यांना विविध सबबीखाली कार्यमुक्त केले गेले नाही.

ठळक मुद्देबदली धोरणात बदल, १५ टक्क्यांची मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या काही विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी ठाण मांडून आहे. बदली होऊनही त्यांना कार्यमुक्त केले नाही. अशा कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे.२०२० मध्ये जिल्हा परिषदेत तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रशासकीय आणि विनंतीनुसार अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यापैकी विनंती बदल्यावाले बहुतांश कर्मचारी नवीन विभागात रुजू झाले. मात्र प्रशासकीय बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्याच विभागात मुक्काम ठोकला. काही विभागांमध्ये असे अनेक कर्मचारी ठाण मांडून बसले आहे. त्यांना विविध सबबीखाली कार्यमुक्त केले गेले नाही.प्रशासकीय बदली झाल्यानंतरही काही कर्मचाऱ्यांनी जुन्याच विभागात कायम राहण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडे फिल्डींग लावून कार्यमुक्त होण्यास टाळाटाळ केली. आता ही बाब सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या लक्षात आली. त्यांनी नव्याने सर्व विभाग प्रमुख आणि बीडीओंना आदेश निर्गमित केले. त्यात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले.

बदली धोरणात बदल, १५ टक्क्यांची मर्यादासीईओंनी यावेळी बदली धोरणातही बदल केला आहे. शासनाच्या निर्णयानुसार १५ टक्केच्यावर बदल्या होणार नाही. आदिवासी क्षेत्र, नक्षलग्रस्त, पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली त्याच क्षेत्रांतर्गत करता येणार आहे. ज्या कार्यालयात यापूर्वी काम केले अशा कार्यालयात १५ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बदली करता येणार नाही. आदिवासी क्षेत्रात तीन वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी प्रशासकीय बदलीस पात्र राहणार आहे. बिगर आदिवासी क्षेत्रातील कार्यरत कर्मचारी दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच प्रशासकीय बदलीस पात्र ठरणार आहे. प्रशासकीय व विनंती बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची आपसी बदली होणार नाही.बाॅक्स

कारणे दाखवा नोटीससीईओंनी संबंधित विभाग प्रमुख  आणि गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप का कार्यमुक्त केले नाही,  याचा खुलासा मागितला आहे.      तसेच जे अधिकारी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणार     नाही त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग  कारवाई करण्याचा इशारा दिला  आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली