शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजीत घरकुलासाठी नागरिकांचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST

अतिक्रमणधारक महत्त्वाचा घटक आहे. ज्यांना स्वतःची जागा उपलब्ध नसल्यास २०११ पूर्वीपासून वास्तव्यात असलेल्या  अतिक्रमणधारकांना लीज पट्टे द्या असे नमूद असूनही आजपर्यंत पालिकेने पट्टे वाटप केलेले नाहीत. ते तत्काळ देण्यात यावेत अशी मोर्चेकरांची मागणी होती. जलाराम मंदिर येथून  मोर्चाची सुरुवात झाली. महेश पवार यांच्या नेतृत्वात मोर्चेकरी नगरपरिषद कार्यालयावर धडकले. तेथे मुख्याधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांना घरे मिळावी या मागणीसाठी मंगळवारी येथे धडक मोर्चा काढण्यात आला.    महाराष्ट्र राज्य शासनाच्या ७ फेब्रुवारी २०१९ च्या परिपत्रकानुसार केंद्र व राज्य सरकारने बेघरांना २०२२ पर्यंत घरे देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असून राज्यातील नगरपरिषदांना आदेशदेखील देण्यात आले होते.ज्यात अतिक्रमणधारक महत्त्वाचा घटक आहे. ज्यांना स्वतःची जागा उपलब्ध नसल्यास २०११ पूर्वीपासून वास्तव्यात असलेल्या  अतिक्रमणधारकांना लीज पट्टे द्या असे नमूद असूनही आजपर्यंत पालिकेने पट्टे वाटप केलेले नाहीत. ते तत्काळ देण्यात यावेत अशी मोर्चेकरांची मागणी होती. जलाराम मंदिर येथून  मोर्चाची सुरुवात झाली. महेश पवार यांच्या नेतृत्वात मोर्चेकरी नगरपरिषद कार्यालयावर धडकले. तेथे मुख्याधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले. तेथून तहसील कार्यालय येथे जाऊन तहसीलदार पूजा माटोडे यांना निवेदन दिले. अतिक्रमण धारकांची मोजणी थांबल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालय उपअभियंता यांना निवेदन देऊन आंदोलकांनी राहत्या जागेची मोजणी करण्यासाठी आक्रमक भूमिका मांडली. ग्रामीणमध्येही बरेच लोक घरकुलापासून वंचित आहेत. आजही शेकडो लोक घरकुलाच्या प्रतीक्षा यादीत आहेत. या मोर्चामध्ये संयोजक महेश पवार, मोहम्मद पठाण, गजू भालेकर, प्रसाद वाढई, विश्वास निकम, रफीक बाबू, होमदेव किनाके, मनोज ढगले, मनोज हामंद, अमोल बावने, सागर मोहूर्ले, धीरज भोयर, संजय ढगले, बालू खांडरे, अंकुश ठाकरे, मोरेश्वर वातिले, सूरज उल्हे, प्रितम हिवाळे, कुंदन ऊइके, गजू दीकुंडवार, अशोक भोंग, राहुल गायकवाड, शेंद्रे साहेब, विष्णू शिंदे, अशोक नांदेकर, ललिता डोंगरे, बेबीबाई तलमले, तानबाजी बावणे आदी सहभागी होते.

 

टॅग्स :Morchaमोर्चा