शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे उत्पादन घटल्याने आणेवारी पुन्हा बदलणार

By admin | Updated: November 14, 2015 02:40 IST

जिल्ह्यात कापसाच्या उत्पादनात बरीच घट झाल्याचे दिसत आहे. कापसाचा वेचा अपेक्षेनुसार नाही.

आठ तालुक्यांच्या नजरा : अंतिम आणेवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा यवतमाळ : जिल्ह्यात कापसाच्या उत्पादनात बरीच घट झाल्याचे दिसत आहे. कापसाचा वेचा अपेक्षेनुसार नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये जाहीर होणाऱ्या अंतिम पीक आणेवारीत उर्वरित आठ पैकी किती तालुक्यांना बदलाचा दिलासा मिळतो, याकडे नजरा लागल्या आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तम दाखवून शासनाने नजर पीक आणेवारीत केवळ वणी तालुक्यातील दोन गावांची स्थिती गंभीर दाखविली होती. उर्वरित सर्व गावांमध्ये आलबेल असल्याचे चित्र निर्माण केले गेले. मात्र या चुकीच्या आणेवारी विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीच नव्हे तर सत्ताधारी भाजपा-सेनेनेही नाराजी व्यक्त केली. पीक काढण्याच्या पद्धतीबाबत आमदार मनोहरराव नाईक यांच्यासह पालकमंत्र्यांनीही असमाधान नोंदविले. त्यानंतर सुधारित पीक आणेवारी जाहीर केली गेली. त्यात १६ पैकी आठ तालुक्यात आणेवारी ५० टक्क्या पेक्षा कमी नोंदविली गेली. मात्र उर्वरित आठ तालुक्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. जिल्ह्यात सर्वत्र सारखा पाऊस झाला असताना कुठे आणेवारी कमी आणि कुठे जास्त का असा प्रश्न उपस्थित केला गेला. जेथे ५० टक्क्यापेक्षा जास्त आणेवारी दाखविली गेली तेथील पिकांची स्थितीसुद्धा बिकट आहे. कापसाचे अपेक्षित उत्पादन झालेले नाही. कोरडवाहू शेतकरी तर नुकसानीच्या खाईत लोटला गेल्याचे चित्र आहे. कापसाचा पहिलाच वेचा प्रभावित झाला. त्यात अपेक्षेनुसार उत्पादन झाले नाही. त्यामुळे या घटलेल्या कापूस उत्पादनाची दखल अंतिम पीक आणेवारी जाहीर करताना घेतली जाणार असल्याचे महसूल सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आठ पैकी आणखी काही तालुक्यांची पीक आणेवारी ५० पैशापेक्षा कमी नोंदविली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच या आठ तालुक्यातील जनतेच्या नजरा १५ डिसेंबरला जाहीर होणाऱ्या अंतिम पीक आणेवारीकडे लागल्या आहेत. कापूस उत्पादनाच्या आधारे कृषी व महसूलची यंत्रणा त्या आठ तालुक्यातील पीक आणेवारीचा फेरआढावा घेत असल्याचे सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)