शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या सभांमध्ये मजुरांचीच गर्दी

By admin | Updated: October 7, 2014 23:40 IST

निवडणुकांमधील प्रचार सभांमध्ये उसळणाऱ्या गर्दींवरून विजयाचे गणित मांडले जाते. त्यामुळेच प्रत्येक उमेदवार आपल्या नेत्याच्या सभेला गर्दी व्हावी यासाठी प्रयत्न करतो. शहराच्या ठिकाणी होणाऱ्या सभांना

रूपेश उत्तरवार - यवतमाळ निवडणुकांमधील प्रचार सभांमध्ये उसळणाऱ्या गर्दींवरून विजयाचे गणित मांडले जाते. त्यामुळेच प्रत्येक उमेदवार आपल्या नेत्याच्या सभेला गर्दी व्हावी यासाठी प्रयत्न करतो. शहराच्या ठिकाणी होणाऱ्या सभांना गर्दी होण्याची शक्यता कमी असल्याने आता गावखेड्यावरून मजुरांना आणले जाते. त्यासाठी त्यांना मजुरीही दिली जाते. विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे. जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तस तसे राजकीय नेत्यांच्या सभाही होत आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. या सभांंना होणारी गर्दी पाहून प्रत्येकच जण हबकत आहे. मात्र ही नेमकी गर्दी होते कशी, याचा शोध घेतला असता अर्ध्यापेक्षा अधिक श्रोते गाव खेड्यातून रोजाने आणलेले मजूर असल्याचे दिसून येते. या मजुरांचे दरही ठरले आहेत. महिलेला मजुरीसाठी १०० रुपये तर पुरुषाला २०० रुपये दिले जाते. या मजुरांना एकत्र करून सभेपर्यंत आणणाऱ्या मेटकराचे दर ५०० रुपये आहे. शहरालगतच्या गावातून मजुरांना वाहनाने सभास्थळी आणले जाते. या मजुरांची खास बडदास्तही ठेवली जाते. तरुणांसाठी गुटखा, खर्रा आदींची व्यवस्था केली जाते. सभेसाठी अनेकदा तर चुल बंद निमंत्रण दिले जाते. एकवेळच्या भोजनाचीही व्यवस्था या कार्यकर्त्यांची केली जाते. त्यामुळे गावागावात सध्या मजूरच दिसत नाही. आज इथली सभा संपली की उद्या तिथली सभा असाच त्यांचाच प्रवास सुरू आहे. कुठलेही काम नाही. सभेतील नेता काय बोलतो याचेही त्यांना घेणे-देणे नसते. काही मंडळी तर सभेत भाषण सुरू असताना आपल्याच गप्पांमध्ये व्यस्त असतात. सभेत बसायचे, वाटले तर टाळ्या वाजवायच्या आणि निघून यायचे. कोणत्याही पक्षाचे बंधन नाही की विचाराचे केवळ मजुरी मिळते ना हीच त्यांची भावना असते. या सर्व प्रकारामुळे गावात मात्र मजूर मिळणे कठीण झाले आहे. शेतातील कामे खोळंबली आहे. गत आठवड्यापासून तर कुणी कामावर यायलाही तयार नाही. त्यामुळे शेतकरी हतबल दिसत आहे. इकडे नेत्यांच्या सभा हाऊसफुल्ल होत असताना शेतात मात्र मजूर दिसत नाही. विक्रमी सभांचा आकडा सांगत विजयाचे गणित मांडायचे.