शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

निकष डावलून सुरू आहे ले-आऊटचा व्यवसाय

By admin | Updated: March 6, 2015 02:06 IST

शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर ले-आऊटच्या व्यवसायाला उधाण आले आहे. नियमबाह्यरीत्या शासनाचे निकष डावलून ले-आऊट पाडणे सुरू आहे.

कळंब : शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर ले-आऊटच्या व्यवसायाला उधाण आले आहे. नियमबाह्यरीत्या शासनाचे निकष डावलून ले-आऊट पाडणे सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून अत्यल्प भावात जमिनी घेण्यावर ले-आऊट व्यावसायिकांचा जोर आहे. उल्लेखनीय म्हणजे शासनाच्या निकषाप्रमाणे ले-आऊट टाकताना आवश्यक त्या सोयीसुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे ग्राहकांचीही गैरसोय होत आहे. यवतमाळ-नागपूर या मुख्य मार्गावर तसेच चिंतामणीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या कळंब शहरातील जागेला गेल्या काही वर्षात अतिशय भाव आला आहे. त्यामुळे यवतमाळ-नागपूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू आहे. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अनेकजण नियम डावलून केवळ पैशावर डोळा ठेवून हा व्यवसाय करत आहे. यामध्ये एकीकडे शासनाचा महसूल बुडत असतानाच दुसरीकडे प्लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकालाही त्याच्या हक्काच्या सोयीसुविधा मिळत नाहीत. ले-आऊट टाकताना त्यामध्ये नाल्या, वीज, पाणी, पक्के रस्ते व इतर अनेक प्रकारच्या आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा ले-आऊटमालकानेच करून देणे आवश्यक आहे. परंतु शासनाचे हे निकष अनेकजण पाळत नसल्याचे दिसून येतात. प्लॉटची खरेदी झाल्यानंतर सोयीसुविधांबाबत हात वर केल्या जाते. अशावेळी प्लॉट खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र अडचणींचा सामना करावा लागतो. (तालुका प्रतिनिधी)