कोरोनाने तिघांचा मृत्यू, ११७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 05:00 AM2020-09-10T05:00:00+5:302020-09-10T05:00:26+5:30

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये वणी २३, दिग्रस १३, नेर नऊ, घाटंजी ६, पुसद ३, आर्णी ४, उमरखेड २, पांढरकवडा २, कळंब २, महागाव २, दारव्हा एक येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजार २८१ वर पोहोचली आहे. यापैकी होम आयसोलेशनमध्ये ३१५ जण आहे. वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्ह्यातील इतर कोविड सेंटरवर उपचार घेत असलेल्यांची संख्या ९६६ इतकी झाली आहे.

Corona kills three, adds 117 new positive patients | कोरोनाने तिघांचा मृत्यू, ११७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

कोरोनाने तिघांचा मृत्यू, ११७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Next
ठळक मुद्देयवतमाळात ४९ : वणी २३, दिग्रस १३, नेरमध्ये नऊ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या २४ तासात तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर ११७ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. आयसोलेशन वार्ड व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले ७३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सर्वाधिक ४९ रुग्ण यवतमाळ शहर व तालुक्यात आढळले आहे. मृत्यू झालेल्या तिघांमध्ये आर्णी, पांढरकवडा, दिग्रस येथील व्यक्तींचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये वणी २३, दिग्रस १३, नेर नऊ, घाटंजी ६, पुसद ३, आर्णी ४, उमरखेड २, पांढरकवडा २, कळंब २, महागाव २, दारव्हा एक येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजार २८१ वर पोहोचली आहे. यापैकी होम आयसोलेशनमध्ये ३१५ जण आहे. वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्ह्यातील इतर कोविड सेंटरवर उपचार घेत असलेल्यांची संख्या ९६६ इतकी झाली आहे. आता जिल्ह्यात चार हजार ४६४ इतके एकूण पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहे. यापैकी तीन हजार २५५ जण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डात २८४ जण उपचार घेत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी १३५ नमुने तपासणीकरिता पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत ५७ हजार ८३३ नमुने तपासणीला पाठविले आहे. यातील ५४ हजार ५१२ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर तीन हजार ३२१ नमुन्यांचा अहवाल अजूनही कोरोना प्रयोगशाळेत प्रलंबित आहे. वेळेत अहवाल येत नसल्याने कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजना सपशेल फोल ठरत आहे. आतापर्यंत ४९ हजार ८४८ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तपासणीची गती वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र अजूनही अपेक्षित गती मिळाली नाही.

कोरोना वेगाने का पसरतो ?
लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येक जण बिधास्तपणे फिरत आहे. हे तर माझे सहकारी आहेत, ईथे मास्कची काय आवश्यकता आहे, हे तर माझे जवळचे मित्र आहे, जवळचे नातेवाईक आहेत असे म्हणून प्रत्येक जण विना मास्क फिरत आहे, यातून कोरोना पसरत आहे.

Web Title: Corona kills three, adds 117 new positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.