पुसदमध्ये दुसऱ्या दिवशीही कोरोना ब्लास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:07+5:30

पुसद शहर व तालुका कोरोनाचे हॉट स्पॉट बनला आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ५० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२९ वर पोहोचली आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २०२ झाली आहे.

Corona blast on the second day in Pusad | पुसदमध्ये दुसऱ्या दिवशीही कोरोना ब्लास्ट

पुसदमध्ये दुसऱ्या दिवशीही कोरोना ब्लास्ट

ठळक मुद्दे५० अहवाल पॉझिटिव्ह : अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पोहोचली १२९ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा ब्लास्ट झाला. शुक्रवारी दुपारपर्यंत तब्बल ५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या १२९ वर पोहोचली आहे.
पुसद शहर व तालुका कोरोनाचे हॉट स्पॉट बनला आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ५० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२९ वर पोहोचली आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २०२ झाली आहे. शुक्रवारी शहरातील नवीन पुसद, महावीरनगर, वसंतनगर, श्रीरामपूर आदी परिसरातील नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली आहे.
प्रशासनाने २८३ नागरिकांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी सोमवारी ६२ स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आले होते. या ६२ पैकी तब्बल ५० जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. ते सर्व पॉझिटिव्ह आले. अद्याप २२१ जणांचे अहवाल अप्राप्त असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली. यानंतर नव्याने गेल्या दोन दिवसात आणखी १८५ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यांचाही अहवाल अप्राप्त आहे. त्यापैकी काही अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि बकरी ईदमुळे शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुभाष चौक, नगिना चौक, हनुमान वॉर्ड, मस्तान चौक, गढी वॉर्ड, माळीपुरा, बालाजी चौक आदी मार्गाने शुक्रवारी पोलिसांनी पथसंचलन केले. मुस्लीम बांधवांनी बकरी ईद घरीच साजरी करावी, असे आवाहन शहरचे ठाणेदार पांडुरंग फाडे यांनी केले.

Web Title: Corona blast on the second day in Pusad