शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांना

By admin | Updated: May 29, 2014 02:51 IST

व्यापारी दिवसेंदिवस श्रीमंत आणि शेतकरी दिवसेंदिवस अधिक गरीब होत आहे.

व्यापारी दिवसेंदिवस श्रीमंत आणि शेतकरी दिवसेंदिवस अधिक गरीब होत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासोबत ग्राहकांना वाजवी दरात चांगले धान्य मिळावे, शेतकर्‍यांना दोन पैसे जास्त मिळावे यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने पहिला धान्य महोत्सव आयोजित केला आहे. त्या ठिकाणी थेट शेतकर्‍यांनाचा निमंत्रित करण्यात आले आहे.

शेतकरी वर्षभर आपल्या शेतात राबराब राबतो, मात्र त्याला त्याच्या घामाचा मोबदला मिळत नाही. बाजारात धान्य जाताच शेतमालाचे दर कोसळतात. शेतकर्‍यांकडून कमी दरात शेतमालाची खरेदी होते आणि अधिक दरात ते ग्राहकांना विकल्या जाते. घाम न गाळता कमी वेळात श्रीमंत होण्याचा हा राजमार्गच आहे.

यवतमाळच्या पोस्टल ग्राउंड मैदानावर २८,२९ आणि ३0 तारखेला धान्य महोत्सव आयोजीत केला आहे. या महोत्सवासाठी जिल्ह्यातील ५0 शेतकरी गट पुढे आले आहेत. त्यांनी शेतात पिकविलेल्या शेतमालावर प्रक्रिया केली आहे. हा शेतमाल बाजारात विक्रीस आणला आहे. विशेष म्हणजे हा माल शेतकर्‍यांचा असल्याने त्यात कुठलीही भेसळ नाही.

दज्रेदार आणि चांगल्या प्रतिचा हा शेतमाल आकर्षक पॅकींगमध्ये शेतकरी बचतगटाने तयार ठेवला आहे. बाजारातील शेतमालाचे ठोक दर आणि धान्य महोत्सवातील दर यामध्ये मोठी तफावत आहे. व्यापारी प्रतिष्ठानांच्या तुलनेत शेतकर्‍यांचा माल चांगल्या प्रतिचा आहे. त्याचे दर कमी आहे. त्यामुळे हे ग्राहकांच्या पैशाची बचत होण्यास हातभार लागणार आहे. व्यापार्‍यांकडून होणार्‍या आर्थिक लुटीतून शेतकर्‍यांची सुटका होण्यास मदत होणार आहे.

धान्य महोत्सवात शेतकर्‍यांनी सेंद्रीय उत्पादनाच्या वस्तू बाजारात आणल्या आहेत. सेंद्री डोलारीचे कमल किशोर धीरण यांनी सेंद्रीय तुरडाळ या धान्य महोत्सवात आणली आहे. शिवाय बेसन आणि गहू विक्रीस आणला आहे. रसायनमुक्त प्रक्रिया धान्य त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. यासोबत बापट यांनी सेन्द्रीय भाजीपाला धान्य महोत्सवात आणला आहे. ज्वारी, मुग, उडीद आणि तूर, तिळ महोत्सवात आणला आहे.

इसापुरचे अनुराग पाटील यांनी टरबूज उपलब्ध करून दिले आहे. रात चांदना येथील अरविंद बेंडे यांनी काकडी, शिमला मिरची महोत्सवात आणली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रमाई महिला बचतगटाने मुसळी आपल्या शेतात लावली. मुसळी आयुर्वेदिक पावडर येथे आणले आहे. दिग्रस तालुका जैन महिला बचतगटाने लोणचे, चटण्या, आवळे, मुरब्बा टोमॅटो सॉस बाजारात आणला आहे. आलू चिप्स आणि दुग्धजन्य पदार्थसुद्धा इथे उपलब्ध आहे.

यासोबत भुईमुगाच्या शेंगा, टमाटर, कांदे, लसन, हळद पावडर, मसाला, तिखट, शेंगदाना चटनी, शेवळ्या कुरोडया, पापड, सरगुंडे या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध आहे. पहिल्या दिवसांपासूनच ग्राहकांनी या महोत्सवाला भेट देऊन धान्य व इतर वस्तू खरेदीसाठी चांगली गर्दी केल्याचे दिसून आले.