शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात काँग्रेस गटनेतेपदाचा पोरखेळ

By admin | Updated: July 20, 2014 00:09 IST

शहरात काँग्रेस पूर्णत: दुबळी झाली आहे. येथील नगरसेवकांवर नेत्यांचे नियंत्रण नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नगरपरिषदेतील गटनेता सलग तीनदा बदलविण्यात आला आहे.

यवतमाळ : शहरात काँग्रेस पूर्णत: दुबळी झाली आहे. येथील नगरसेवकांवर नेत्यांचे नियंत्रण नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नगरपरिषदेतील गटनेता सलग तीनदा बदलविण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी अर्ध्या तासाच्या फरकाने दोन नगरसेवकांना गटनेता म्हणून नियुक्तीपत्र दिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. नगरपरिषदेत काँग्रेसमध्ये कुणाचाच पायपोस कुणाला नसल्याचे दिसते. गटनेता निवडीवरून निर्माण झालेला वाद थेट उच्च न्यायालयात पोहोचला. शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी समेटासाठी काँग्रेस नगरसेवकांची बैठक बोलाविली. यावेळी नगरसेवक अमोल देशमुख यांना गटनेता म्हणून नियुक्त करीत असल्याचे पत्र जिल्हाध्यक्षांनी दिले. त्यांना सात नगरसेवकांचे समर्थन आहे. मात्र त्यानंतर अर्ध्या तासातच अध्यक्ष वामनराव कासावार यांनी अमोल देशमुख यांची नियुक्ती रद्द ठरवत न्यायालयाच्या निकालाप्रमाणे जाफर सादिक गिलाणी गटनेते राहतील, असे पत्र दिले. काँग्रेससारख्या पक्षात गटनेता निवडण्यावरून एवढी मोठी विसंगती आणि विवाद उद्भवत असल्याचे चित्र पहिल्यांदाच पहावयास मिळत आहे. नगरसेवकांमध्ये दोन गट असून निलंबित नगरसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या बाजूने सात सदस्य तर चार सदस्यांचा वेगळा गट आहे. ही गटबाजी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही कायम असल्याचे काल पुन्हा सिद्ध झाले. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या एकाही नेत्याने आपल्या नगरसेवकांना बोलावून सूचना दिल्या नाही. यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत सुसंवाद संपल्याचे स्पष्ट होते. आज नगरपरिषदेत काँग्रेसकडे ११ नगरसेवक असले तरी त्यापैकी पक्षाचे किती हा प्रश्न निर्माण झाला आहे. नेत्यांमधील विसंगतीमुळे गटनेतेपदाचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहे. यात काय घडामोडी होतात याची उत्सुकता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)