शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

हाताला कामासाठी काँग्रेसला ‘हात’

By admin | Updated: May 17, 2014 02:11 IST

पोटाला चिमटा मारून आईवडिलांनी आम्हाला शिकविले. मोठय़ा खस्ता खाऊन विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतले. पात्रता असूनही नोकरीसाठी दारोदार भटकंती करण्याची वेळ आली. यावेळेस सत्तापरिवर्तनातून ...

यवतमाळ : पोटाला चिमटा मारून आईवडिलांनी आम्हाला शिकविले. मोठय़ा खस्ता खाऊन विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतले. पात्रता असूनही नोकरीसाठी दारोदार भटकंती करण्याची वेळ आली. यावेळेस सत्तापरिवर्तनातून हाताला काम मिळेल असे वातावरण देशभरात होते. त्यामुळेच एकदा विरोधी बाकावरील लोकांना संधी द्यावी म्हणून नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातील एनडीऐच्या बाजूने मतदान केले. देशात आता मोदीचे सरकार येणार असूनलोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवरकायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच स्त्रियांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारने पुढाकर घेतला पाहिजे. राजकीय नेत्यांचा देशाबाहेर असलेला काळा पैसा परत आणला जाईल, ही अपेक्षा ठेऊनच सत्तापरिवर्तनासाठी आम्ही युवकांनी पुढाकार घेतल्याचे ललित राठोड याने सांगितले. सत्तारुढ पक्ष भ्रष्टाचाराने बरबटला होता. एवढेच नाही तर, अनेक दोषींना लोकसभेच्या मैदानात उतरवून जनतेच्या भावनेशी खेळण्यात आले. त्यामुळेच सत्तापरिवर्तनात युवकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला, असे मत आशिष हातागडे याने मांडले. अश्‍वजित शेळके हा युवक म्हणाला, आतापर्यंत दलितांवर खूप अत्याचार झाले. परंतु खर्‍या अर्थाने न्याय मिळाला नाही. दलितांना घाबरवत ठेऊन राजकीय पक्षांनी आपली पोळी शेकली. महायुतीच्या शासन काळात दलितांवर अन्याय होणार नाही, असा आशावाद त्याने व्यक्त केला.इद्रीस खान याने आता ग्रामीण, वृध्द, अशिक्षित, बेरोजगार आणि गरिबांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रकाश धवने म्हणाला, सरकार कोणाचे येणार यापेक्षा बेरोजगारांसाठी ते काय करणार, हे पाहावे लागणार आहे. आतापर्यंंत काँग्रेस सरकारने निराश केले. त्यामुळे भाजप सरकारकडून आम्हा युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षणाकडे आता जातीने लक्ष दिले जाईल, आशा आशावाद सुनील चव्हाणने केला.आम्ही आमचे काम केले. आता सरकारला जनतेला दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती करायची आहे. खासकरून बेरोजगारांसाठी काय करणार, याकडे आमचे लक्ष राहणार असल्याचे संतोष गदई याने सांगितले. शिवम इंगोले म्हणाला, आता खर्‍या अर्थाने देशाची प्रगती होईल आणि देश महासत्ता होईल. एकंदरीत युवकांच्या मनामध्ये नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रचंड आकर्षण आणि विश्‍वास असल्याचे दिसून आले. मात्र येणार्‍या काळात युवकांचा विश्‍वास किती सार्थ ठरतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (लोकमत चमू)‘अच्छे दिन आने वाले है’ ची आशा निर्माण झाल्याच्या भावना नवमतदारांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या. ‘लोकमत’ने शुक्रवारी अनेक युवकांशी मनमोकळा संवाद साधला. आकाश पवार याने मोदी सरकारामुळे बेरोजगारांची समस्या सुटेल, अशी आशा व्यक्त केली. स्थानिकांना रोजगार आणि प्रत्येक मतदारसंघात नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. शेतमालावर आधारीत प्रकल्प आणण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज प्रवीण राठोड याने व्यक्त केली. अनेक वर्षांपासून यवतमाळचा रेल्वे प्रश्न प्रलंबित आहे. आता तरी तो सुटला पाहिजे, अशी अपेक्षा अक्षय अतकरी याने व्यक्त केली.