शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांचा ताळमेळ बिघडला

By admin | Updated: September 22, 2014 23:35 IST

सहकारी संस्थांच्या कामात पारदर्शकता यावी आणि कामकाजाला गती मिळावी, यासाठी सहकार कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. यात ताळेबंद आॅनलाईन करण्याच्या सूचना आहे.

यवतमाळ : सहकारी संस्थांच्या कामात पारदर्शकता यावी आणि कामकाजाला गती मिळावी, यासाठी सहकार कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. यात ताळेबंद आॅनलाईन करण्याच्या सूचना आहे. मात्र गेली २० दिवसांत जिल्ह्यातील दोन हजार ५२६ पैकी केवळ ५६६ संस्थांनी आपला ताळेबंद आॅनलाईन केला आहे. दोन हजार संस्थांचा ताळेबंद अद्यापही सादर झालेला नाही. यासाठी आता केवळ दहा दिवस शिल्लक आहेत.सहकार कायदा १९६० मधील ९७ व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने सहकारी संस्था आॅनलाईन केल्या आहेत. यातील कलम ७९, १ अ आणि कलम ७९ , १ ब नुसार विवरणपत्र मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी ३० सप्टेंंबर अंतिम मुदत देण्यात आली. या मुदतीत लेखापरीक्षण, शिल्लक रकमेचा विनियोग करण्याची योजना, संस्थेचा उपविधी सुधारणेची यादी, संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची तारिख, नियम असेल तिथे निवडणूक घेण्याची दिनांक अशी संपूर्ण माहिती संकेतस्थळावर देणे बंधनकारक आहे.जिल्ह्यात दोन हजार ५२६ सहकारी संस्था आहेत. यात बँका, नागरी सहकारी पतसंस्था, पगारदार संस्था, कृषी पतसंस्था, खरेदी विक्री संघ, जिनिंग प्रेसिंग, मजूरदार संस्था, पाणी वापर संस्था, जंगल कामगार संस्था, औद्योगिक संस्था, बलुतेदार संस्था अशा विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. यातील ५६६ सहकारी संस्थांनी संकेतस्थळावर आॅनलाईन ताळेबंद दिला आहे. दोन हजार संस्थांची चालढकल सुरू आहे. या संस्थांनी ताळेबंद सादर का केला नाही, याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवरी सहकार कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल होणार आहे. सोबतच दंडात्मक कारवाई होणार आहे. सादर केलेली माहिती योग्य आहे की नाही याची तपासणी सहकार विभाग करणार आहे. (शहर वार्ताहर)