महागावचे गावठी दारूचे अड्डे बंद करा, अन्यथा आम्हीच उद्ध्वस्त करू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 06:00 AM2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:22+5:30

ग्रामीण भागात गावठी दारू मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मद्यशौकिनांची संख्याही प्रचंड झाली आहे. गणपती, गौरी सण-उत्सवाच्या काळात तरी पोलीस प्रशासनाने या प्रकारावर पायबंद घालणे गरजेचे आहे. मात्र दारू विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Close the gourmet gourmet haul, otherwise we will be destroyed! | महागावचे गावठी दारूचे अड्डे बंद करा, अन्यथा आम्हीच उद्ध्वस्त करू!

महागावचे गावठी दारूचे अड्डे बंद करा, अन्यथा आम्हीच उद्ध्वस्त करू!

googlenewsNext
ठळक मुद्देदारूबंदीसाठी रणरागिनींचा एल्गार । मुडाणा, धारमोहा, अंबोडा, सवना येथे अड्डे

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यात गावठी दारूच्या गाळपाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे व्यसनाधिनता वाढून संसार देशोधडीला लागत आहे. अखेर महिलांनी रणरागिनीचे रुप धारण करून पोलीस ठाण्यात धडक दिली. तालुक्यात दारूबंदी करण्याची मागणी केली.
ग्रामीण भागात गावठी दारू मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मद्यशौकिनांची संख्याही प्रचंड झाली आहे. गणपती, गौरी सण-उत्सवाच्या काळात तरी पोलीस प्रशासनाने या प्रकारावर पायबंद घालणे गरजेचे आहे. मात्र दारू विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे सध्याचे चित्र आहे. या संदर्भात तालुक्यातील महिलांनी ठाणेदार दामोधर काशीराम राठोड यांना लेखी निवेदन देऊन दारूबंदी करण्याची मागणी केली आहे. राज्य मार्गावरील देशी-विदेशी दारूची दुकाने शासनाच्यावतीने हटविण्यात आल्यानंतर आता ग्रामीण भागात गावठी दारू गाळण्याचा धंदा तेजीत सुरू झाला आहे. तालुक्यातील मुडाणा, धारमोहा, नांदगव्हाण, आंबोडा, सवना, टेंभी, काळी, पिंपरीसह परिसरात गावठी दारूचा महापूर वाहत आहे.
या अवैध गावठी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा अन्यथा आम्हाला स्वत: दारू अड्डे बंद करावे लागेल, असा इशारा नांदगव्हाण येथील सीमाबाई मनोहर राठोड, गुंफाबाई गजानन राठोड, शेकोनाबाई बबन आडे, सखी राठोड, शेशी चव्हाण, प्रतिमा विशाल आडे, लताबाई गोडबैले, रंजनाबाई जाधव, अरुणा रमेश जाधव, कल्पना रमेश आडे यांनी दिला आहे.

Web Title: Close the gourmet gourmet haul, otherwise we will be destroyed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.