उमरखेड शहरात कडकडीत बंद

By Admin | Updated: September 7, 2014 00:11 IST2014-09-07T00:11:46+5:302014-09-07T00:11:46+5:30

गणेश स्थापना मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या आरोपींंना अटक आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी शनिवारी उमरखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

In the city of Umarkhed, the sticks are closed | उमरखेड शहरात कडकडीत बंद

उमरखेड शहरात कडकडीत बंद

चर्चा निष्फळ : गणेश स्थापना मिरवणुकीवर दगडफेकप्रकरण
उमरखेड (कुपटी) : गणेश स्थापना मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या आरोपींंना अटक आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी शनिवारी उमरखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान दोनही गटांंच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नसल्याने वृत्त लिहिस्तोवर बंद कायम होता.
२९ आॅगस्ट रोजी गणेश स्थापना मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी दोनही गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान शनिवारी आमदार विजय खडसे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आदींनी दोनही गटांची बैठक घेतली. यात कुठलाही तोडगा निघाला नाही. दोनही गटांनी आपली बाजू मांडली.
यावेळी राजू जयस्वाल, नारायण भट्टड, अ‍ॅड. संंतोष जैन, डॉ. अजय नरवाडे, नितीन भुतडा, सुरेश माहेश्वरी, नंदूसेठ अग्रवाल, रमेश चव्हाण, सुनील टाक, प्रशांत पत्तेवार, शिवाजी माने, कैलास कदम, पप्पू जयस्वाल, संदीप ठाकरे, बालाजी उदावंत, विलास चव्हाण, एहजाज जनाब, रिफत अन्सारी, साजीद जागीरदार, सय्यद निसार अहेमद, मजहर टेलर, इसा राज आदी उपस्थित होते. तहसील कार्यालयात दुपारी ३ ते ५ पर्यंत या विषयावर बैठक झाली. यात बंद मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न झाले. यानंतरही अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे, ठाणेदार महिपालसिंग चांदा यांनी मित्र गणेश मंडळ, किसान गणेश मंडळ आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आले. (वार्ताहर)

Web Title: In the city of Umarkhed, the sticks are closed