पांढरकवडा येथे चिनी मांजाची धडाक्यात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:38+5:30

या मांजामुळे नागरिकांसह पक्षांचाही जीव धोक्यात आला असून, विक्रेत्यांवर आतापर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येत्या दोन दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपल्याने पांढरकवडा शहरासह तालुक्यात पतंगबाजीला उधाण आले आहे. त्यामुळे बाजारपेठेत मांजा व पतंग खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र पतंगप्रेमींमध्ये चिनी व नायलॉन मांजाची क्रेझ दिसून येत आहे. गतवर्षी या मांजामुळे अनेक अपघात झाल्यानंतरही यंदा या मांजाची मागणी होत आहे.

Chinese cat sells at White House | पांढरकवडा येथे चिनी मांजाची धडाक्यात विक्री

पांढरकवडा येथे चिनी मांजाची धडाक्यात विक्री

Next
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : मकरसंक्रांतीच्या पर्वावर पतंगबाजीला उधाण, पाखरांचे जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : बंदी असतानाही पांढरकवडा शहर व तालुक्यातील बाजारपेठेत चायनीज व नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री सुरू आहे. परिणामी या घातक मांजावरील बंदी ही केवळ कागदावरच ठरत आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
या मांजामुळे नागरिकांसह पक्षांचाही जीव धोक्यात आला असून, विक्रेत्यांवर आतापर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येत्या दोन दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपल्याने पांढरकवडा शहरासह तालुक्यात पतंगबाजीला उधाण आले आहे. त्यामुळे बाजारपेठेत मांजा व पतंग खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र पतंगप्रेमींमध्ये चिनी व नायलॉन मांजाची क्रेझ दिसून येत आहे. गतवर्षी या मांजामुळे अनेक अपघात झाल्यानंतरही यंदा या मांजाची मागणी होत आहे. परंतु हा मांजा नागरिकांसह पशू-पक्ष्यांच्या गळ्याचा फास ठरत आहे. नागरिकांना चालताना किंवा वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन रस्त्याने जावे लागते. अनेक पक्षी, प्राणी, मनुष्य जखमी किंवा प्रसंगी मृत्युमुखी पडतात. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य सरकारने १९८६ पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने बाजारपेठेत नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. प्लास्टिकला बंदी असतानाही प्लास्टिकपासून निर्मित पतंगांची धडाक्यात विक्री सुरू आहे. नायलॉन मांजासह प्लास्टिकच्या पतंग झाडात किंवा वीज वाहिनीत अडकल्याने त्या पक्ष्यांसाठी घातक ठरत आहेत.

Web Title: Chinese cat sells at White House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार