शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

शतकोटीतील वृक्षांचा पंचनामा

By admin | Updated: August 22, 2014 00:07 IST

शतकोटी वृक्ष लागवड योजनेत आतापर्यंत लाखो झाडे लावल्याचे दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र या वृक्षलागवडीचे मूल्यमापनच झाले नाही. २०११ पासून लावण्यात आलेल्या वृक्षापैकी प्रत्यक्षात किती

२५० शाळा : १५ सप्टेंबरपर्यंत मोहीम यवतमाळ : शतकोटी वृक्ष लागवड योजनेत आतापर्यंत लाखो झाडे लावल्याचे दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र या वृक्षलागवडीचे मूल्यमापनच झाले नाही. २०११ पासून लावण्यात आलेल्या वृक्षापैकी प्रत्यक्षात किती जीवंत आहे, याचा पंचनामा गावपातळीवर करण्यात येणार आहे. ही मोहीम २५ आॅगस्टपासून हाती घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील अडीचशे शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून ही पडताळणी केली जाणार आहे. या कामी राष्ट्रीय हरितसेना लावण्यात येणार आहे. व्हीआर पॅटर्ननुसार वृक्षांची लागवड झाली की नाही. कार्यक्रम राबविताना प्रत्यक्षात किती वृक्षांची लागवड झाली आणि आज जीवंत असलेले वृक्ष याचे थेट वृक्षारोपण झालेल्या जागेवर जाऊन पाहणी केली जाणार आहे. एक प्रकारे या योजनेतील अपहार उघड करण्याचा हा प्रयत्न आहे. वृक्ष लागवडीच्या योजना कागदावरच राबविल्या जातात. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र याची उलट तपासणी शासनस्तरावरून झाली नाही. त्यामुळे लावलेल्या झाडांपैकी प्रत्यक्ष जीवंत किती याचा कुठलाही आकडा यंत्रणेजवळ उपलब्ध नाही. त्यामुळेच जिल्हास्तरावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक या समितीचे सचिव आहे. तर रोहयो उपजिल्हाधिकारी, उपमुख्याधिकारी पंचायत हे या समितीचे सदस्य आहे. या मूल्यमापनासाठी सर्वांनाच प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक गावातून जीवंत वृक्षांची माहिती गोळा केली जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय हरितसेनेत काम करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. २०११-१२, २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षांमध्ये लागवड केलेले वृक्ष आणि आज त्यापैकी जीवंत असलेले वृक्ष याचा हा सर्वे आहे. विशेष म्हणजे ही मोहीम राबविताना संबंधित यंत्रणेकडून निकषांंचे पालन करण्यात आले की नाही, याचीही पडताळणी केली जाणार आहे. हा कार्यक्रम १५ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर दर्शनी भागातच वृक्ष लागवड केली आहे. त्यानंतर आकडे फुगवून केवळ कागदोपत्रीच हा कार्यक्रम उरकण्यात आला आहे. आता या वृक्ष लागवडीची उलट तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये शतकोटी वृक्ष लागवड योजनेतील बोगसपणा उघड होणार आहे. आजपर्यंत दिशाभूल करणारी आकडेवारी दाखविल्याबद्दल कुणावरही कारवाई झालेली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)