शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंप चोरट्या टोळीचा पर्दाफाश

By admin | Updated: November 9, 2014 22:35 IST

यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात गेल्या वर्षभरात शेकडो मोटरपंप, पाईप आणि केबल चोरीस गेल्या. पोलिसांच्या अनास्थेने चोरटे निर्ढावले होते. अखेर गावातील शेतकऱ्यांनीच कृषिपंप चोरट्या

शिवानंद लोहिया - हिवरीयवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात गेल्या वर्षभरात शेकडो मोटरपंप, पाईप आणि केबल चोरीस गेल्या. पोलिसांच्या अनास्थेने चोरटे निर्ढावले होते. अखेर गावातील शेतकऱ्यांनीच कृषिपंप चोरट्या टोळीचा पर्दाफाश केला. चोरीतील एक मोटरपंप, ७० पाईप ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. डोमा चव्हाण ऊर्फ महाराज रा.भांबराजा असे संशयिताचे नाव आहे. तर मोहन दगडू राठोड रा.भांबराजा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्याच्या साथीदाराचे नाव आहे. गेल्या वर्षभऱ्यात हिवरीसह लगतच्या गावांमधील शेतातून शेकडो मोटरपंप, पाईप, केबल आणि इतर शेती साहित्य चोरीस गेले. उगाच पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून यातील बहुतांश घटनांची तक्रारच शेतकऱ्यांनी पोलिसात दिलेली नाही. यातच सुभाष भिकमचंद लोहिया रा.हिवरी यांच्या शेतातील मोटरपंप सुमारे पंधरा दिवसांपूर्वी चोरीस गेला. गावातील अथवा लगतच्या परिसरातील चोरट्यानेच हा मोटरपंप लंपास केला असावा, असा संशय त्यांना होता. अनिल गावंडे यांच्या शेतातील सोयाबीन चोरीस गेल्यानंतर दोघेही चोरट्याच्या मागावर होते. त्यातच अशोक मनवर यांच्या भांब येथील शेतात चोरीतील सोयाबीन आढळून आली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच शेतकरी लोहिया तेथे पोहोचले. यावेळी त्यांनीही शेताची बारकाईने पाहणी केली. त्यात विहिरीतील मोटरपंप आपलेच असल्याची ओळख त्यांनी पटविली. शिवाय काही शेतकऱ्यांनी सुमारे ७० पाईपची ओळख पटविली. दरम्यान, अशोक मनवर यांना शेतात पाचारण करण्यात आले. तेव्हा त्यांनी हे शेत तीन वर्षासाठी डोमा चव्हाण ऊर्फ महाराज याला मक्त्याने दिले असल्याचे सांगितले. त्याचीच ही मोटार आणि पाईप असल्याचीही माहिती त्यांनी दिली. त्यावरून शेतकऱ्यांनी चोरीतील मोटर, पाईप आणि नोझल असे शेती साहित्य ताब्यात घेऊन यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. यावेळी ग्रामीण ठाणेदारांनी मात्र चोरीतील हे साहित्य ठाण्यात का आणले, असा प्रश्न उपस्थित करून चोरीचा छडा लावणाऱ्या शेतकऱ्यांवरच आगपाखड केली. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. वास्तविक शेतकरी अथवा नागरिकांनी अशी गंभीर घटना उघडकीस आणल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला हवी. मात्र या प्रकाराने गुन्हेगारी नियंत्रणात कोण मदत करेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.