बौद्ध महासभेतर्फे बुद्ध जीवन परिषद

By Admin | Updated: June 3, 2017 00:47 IST2017-06-03T00:47:26+5:302017-06-03T00:47:26+5:30

दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा शहर व तालुका शाखेतर्फे येथील राजेराम ले-आऊटमधील लुम्बिनी बौद्ध विहारात

Buddha Life Council by the Buddhist General Assembly | बौद्ध महासभेतर्फे बुद्ध जीवन परिषद

बौद्ध महासभेतर्फे बुद्ध जीवन परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा शहर व तालुका शाखेतर्फे येथील राजेराम ले-आऊटमधील लुम्बिनी बौद्ध विहारात बुद्ध जीवन परिषद घेण्यात आली. उद्घाटन भदन्त विपस्सी महाथेरो यांच्या हस्ते झाले. भदन्त राहुलबोधी अध्यक्षस्थानी होते.

मनातून राग, द्वेष संपविण्यासाठी चार आर्यसत्य, अष्टांगमार्ग, नामरूप, प्रतित्यसंमुपांद आदी बुद्धाच्या धम्माचे यथाभूत दर्शन करून धम्माचे आचरण करण्यात आपले खरे कल्याण सामावलेले आहे, असे भदन्त राहुलबोधी यांनी सांगितले.

बुद्धाच्या धम्म आचरणाने आपल्या जीवनात विद्येचा प्रकाश उजळ आणि अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा, अशी मंगलकामना भदन्त विपस्सी महाथेरो यांनी यावेळी केली.

परिषदेमध्ये सुखदेवराव जाधव, सदाशिवराव भालेराव, राजेश्वर शिरसाट, गोविंद मेश्राम आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आनंद भगत यांनी केले. शीला मेश्राम यांनी परिषदेची भूमिका मांडली. संचालन जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने यांनी, तर आभार जिल्हा महासचिव करुणा शिरसाट यांनी मानले. मान्यवरांचे स्वागत यवतमाळ तालुकाध्यक्ष काशीनाथ ब्राह्मणे यांनी केले. कोषाध्यक्ष महादेवराव अढावे, उपाध्यक्ष भीमराव काळपांडे यांच्या हस्ते भिक्खु संघाला दान देण्यात आले.

शहर अध्यक्ष चंद्रकांत अलोणे, आनंद भगत, ताई भगत यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. महादेव अढावे यांनी कविता सादर केली. गुलाबराव रामटेके, संगीता चंदनखेडे, सुखदेवराव सिंगारकर, संजय वानखडे, गवळी, वाघमारे, अक्षय जाधव, प्रशांत अलोणे, कांची सुरेंद्र आंबुलकर, कुमारी गवळी, कांबळे यांच्यासह सुजाता महिला मंडळाने या कार्यक्रमासाठी परिश्रम घतले.

Web Title: Buddha Life Council by the Buddhist General Assembly