शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘शकुंतले’चा ब्रॉडगेज खर्च ५०० कोटींवरून १६०० कोटींवर

By admin | Updated: August 4, 2014 23:58 IST

नॅरोगेज शकुंतला रेल्वेचा मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी नऊ वर्षापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी या मार्गासाठी ५०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र त्याला मान्यताच मिळाली नाही.

भविष्य टांगणीला : ब्रिटिश कंपनीला हक्क सोडण्यासाठी हवे तीन कोटी रूपेश उत्तरवार - यवतमाळ नॅरोगेज शकुंतला रेल्वेचा मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी नऊ वर्षापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी या मार्गासाठी ५०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र त्याला मान्यताच मिळाली नाही. आता हा खर्च १६०० कोटींवर पोहचला आहे. तर शकुंतलेवरचा हक्क सोडण्यासाठी ब्रिटिश कंपनीला तीन कोटी रुपये हवे आहेत. आता शकुंतला अनिश्चित काळा बंदी झाली आहे. त्यामुळे शकुंतलेल्याच्या भविष्याचे काय असा प्रश्न निमार्ण झाला आहे.केंद्रीय कमिटीने २००५ मध्ये रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतरण करण्यासाठी अहवाल दिला होता. खासदार अनंत गीते या समितीचे अध्यक्ष होते. शंकुतलेचा मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी ५०० कोटींचा प्रस्ताव रेल्वे बोर्डपुढे ठेवला होता. मात्र हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. सध्या वाढत्या महागाईने या प्रकल्पाची किमत १६०० कोटींवर पोहचली आहे. ५०० कोटी देण्यासच केंद्र सरकार तयार नव्हते तर आता १६०० कोटी रूपये देतील काय असा प्रश्न आहे.क्लिक अ‍ॅन्ड निक्सन कंपनीने १९१२ मध्ये करारावर यवतमाळ-मूर्तीजापूर रेल्वे सुरू केली होती. हा करार आता संपला आहे. ब्रिटिश कंपनीचा करार संपताच शकुंतलेचा प्रवास थांबला. ही रेल्वे सुरू झाली त्यावेळी कंपनीला खर्च मोठा आला होता. ब्रिटिश कंपनीने या रेल्वेवरचा हक्क सोडण्यासाठी तीन कोटी रूपये मागितले आहेत. ११३ किमीचा हा लोहमार्ग पूर्ण करतांना त्यावेळी यावर ३०० पूल उभारण्यात आले होते. त्यावेळी लागलेला खर्च हक्क सोडतांना ब्रिटिश कंपनीने मागितला आहे. मात्र भारत सरकारने याबाबत कुठलाही विचार केला नाही. परिणामी करार संपल्यानंतरही ही रेल्वे सुरू करण्यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद नाही. गतवर्षी ही शकुुंतला बंद झाल्यानंतर लोकप्रतिनिधींचा दबाव वाढला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पब्लिक अ‍ॅमिनीटी फंडचा वापर केला. ही रेल्वे २४ जुलैपर्यंत चालविण्यात आली. आता ही तरतूदही संपली आहे. त्यामुळे शकुंतलेला चालवायचे कसे असा प्रश्न आहे.