शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने पाच वर्षे टॉयलेट पेपरसारखा वापर केला, किशोर तिवारी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 18:26 IST

भाजप सरकारने दिलेल्या शब्दांचे पालन केले नाही. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष म्हणून अधिकार दिले.

यवतमाळ  - भाजप सरकारने दिलेल्या शब्दांचे पालन केले नाही. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष म्हणून अधिकार दिले. मात्र नंतर त्यावर मर्यादा घातल्या. त्यामुळे अपेक्षित काम करता आले नाही. पाच वर्षे माझा केवळ टॉयलेट पेपरसारखा वापर केला गेला, असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष तथा शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केला. किशोर तिवारी म्हणाले, भाजप सोबत २०१९ पर्यंतचा करार संपला आहे. शेतकरी, आदिवासी व मध्यमवर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारसोबत बसलो. मात्र त्यांनी दगा दिला. २०१८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता, मात्र तो पाळला नाही. १६ फेब्रुवारी २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पांढरकवडा येथे जाहीर सभा झाली. या सभेचे संपूर्ण नियोजन माझ्याकडे होते. सभेला उपस्थितीही भरपूर होती. त्यानंतरही या सभेत माझा अपमान करण्यात आला. तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी थेट अपमान केला. पंतप्रधान मोदींनीसुद्धा भाषणात माझा नामोल्लेखही केला नाही. वैयक्तिक लाभासाठी पद मागितले नाही१९७७ पासून जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चळवळीत जुळलो आहे. त्यानंतरही भाजप सरकारकडून सन्मानाची वागणूक देण्यात आली नाही. सरकारकडे अधिका-यांच्या बदल्या, ठेकेदारी, कोळसा ट्रान्सपोर्टिंग या सारख्या वैयक्तिक लाभासाठी पद मागितले नसल्याचे तिवारी यांनी सांगितले. भाजपला धडा शिकविणारआता जिल्ह्यातील चार मतदारसंघातून विदर्भ जनआंदोलन समिती विधानसभा निवडणूक लढणार असून, आपला केवळ वापर करणाºयांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाKishor Tiwariकिशोर तिवारीYavatmalयवतमाळ