शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळचे भाबडे भक्तही निघाले नंदीला दूध पाजायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

महाराष्ट्रात कुठेतरी दगडाचा नंदी चमचाने दूध पित असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. विकासकामे वर्षानुवर्षे न पोहोचणाऱ्या जिल्ह्यातील खेड्यापाड्यात तो व्हिडिओ क्षणार्धात पोहोचला आणि भोळ्या भाविकांच्या मनाचा ताबा घेतला. ग्रामीण भागातील नागरिकही आपापल्या गावातील मंदिरांमध्ये दगडाच्या नंदीला पाणी पाजून पाहू लागले. काही जणांच्या मते हा श्रद्धेचा भाग असला तरी जाणकार याला अंधश्रद्धा ठरवित आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाऱ्याहून वेगवान असलेला सोशल मीडिया आधुनिक जीवनशैलीचा निदर्शक असला तरी याच मीडियाचा गैरवापर करून अंधश्रद्धेला कसे खतपाणी घातले जाते, याचे उदाहरण सध्या जिल्ह्यात पुढे आले आहे. महाराष्ट्रात कुठेतरी दगडाचा नंदी चमचाने दूध पित असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. विकासकामे वर्षानुवर्षे न पोहोचणाऱ्या जिल्ह्यातील खेड्यापाड्यात तो व्हिडिओ क्षणार्धात पोहोचला आणि भोळ्या भाविकांच्या मनाचा ताबा घेतला. ग्रामीण भागातील नागरिकही आपापल्या गावातील मंदिरांमध्ये दगडाच्या नंदीला पाणी पाजून पाहू लागले. काही जणांच्या मते हा श्रद्धेचा भाग असला तरी जाणकार याला अंधश्रद्धा ठरवित आहे. महागाव तालुक्यातील मुडाणा, पांढरकवडा, वणी, उमरखेड तालुक्यातील ढाणकी, नेर तालुक्यातील मांगलादेवी आदी गावांमध्ये हा प्रकार शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत अखंड सुरू होता. मुडाणाच्या नेहरूनगरातील महादेव मंदिरात दगडाचा नंदी पाणी पित असल्याचे लोकांना कुठून तरी कळले. संजय भदाडे, रवी काळे यांनी लगेच दर्शन घेतले. कर्णोपकर्णी हा प्रकार सर्वत्र पसरताच आजूबाजूचे धारमोहा, कोठारी, बोथा, साधूनगर, बेलदरी, धारेगाव, उटी येथील गावकऱ्यांनी नंदीला पाणी पाजण्यासाठी तर काहींनी उत्सुकतेपोटी या मंदिरात धाव घेतली. असाच प्रकार मांगलादेवी, वणी शहरातील सास्तीनगर भागातील मंदिरातही घडला. पांढरकवडा येथील शिबला रोडवर जय संतोषी माता मंदिरालगत असलेला नंदीही पाणी पित असल्याची वार्ता पसरली. त्यामुळे महिलांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी त्याचाही व्हिडीओ बनवून व्हायरल केला. उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे ग्रामदेवता असलेल्या हनुमान मंदिरातही महादेवाच्या पिंडीसह दगडाचा नंदी बैली आहे. सोशल मीडियातील व्हिडिओ पाहून काही गावकऱ्यांनी या नंदी बैलालाही पाणी पाजून पाहिले. विशेष म्हणजे, हा प्रकार पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. भोळ्या भाविकांनी या प्रकाराला दैवी चमत्कार मानले. मात्र विज्ञानाचे जाणकार आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा कोणताही दैवी चमत्कार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र सलग दोन दिवस भाबड्या भाविकांच्या मनातून दगडी नंदीला पाणी पाजण्याची उत्सुकता काही संपली नाही. 

नातेवाइकांनी वाढविली उत्सुकता अन् अफवाआपल्या गावात नंदी दूध-पाणी पितो, असे परगावच्या नातेवाइकांनी खेड्यापाड्यातील नातेवाइकांना फोन करून कळविले. त्यामुळे खेड्यातील नागरिकांनी उत्सुकतेपोटी आपल्याही गावात हा प्रकार घडतो का, हे करून पाहिले. त्यातूनच गावोगावी हे लोन पोहोचले. 

निर्जीव मूर्ती दूध किंवा पाणी पिते ही अंधश्रद्धा आहे. क्वचित प्रसंगी केपिलरी फोर्समुळे पाणी मूर्तीच्या आत खेचले जाते. त्याला सरफेश टेन्शन म्हटले जाते. - सुरेश चोपणे, खगोल अभ्यासक

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया