शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षानंतर वाजली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST

पहिल्या दिवशी जिल्ह्यात ५०२ शाळांमध्ये विद्यार्थी आले. आठवी ते बारावीचे वर्ग गुरुवारपासून सुरू करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हा परिषदेनेही शाळा उघडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, सुरुवातीला केवळ ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे गुरुवारी शहरी क्षेत्रातील शाळा बंदच होत्या. जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकंदर ९८५ शाळा आहेत. त्यापैकी गुरुवारी ५०२ शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसह सुरू झाल्या, तर ४८३ शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी ५०२ शाळा उघडल्या, ४८३ मात्र बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल दीड वर्षापासून विद्यार्थ्यांविना सुन्या सुन्या असलेल्या शाळा अखेर गुरुवारी पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने ‘जिवंत’ झाल्या. राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले.पहिल्या दिवशी जिल्ह्यात ५०२ शाळांमध्ये विद्यार्थी आले. आठवी ते बारावीचे वर्ग गुरुवारपासून सुरू करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हा परिषदेनेही शाळा उघडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, सुरुवातीला केवळ ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे गुरुवारी शहरी क्षेत्रातील शाळा बंदच होत्या. जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकंदर ९८५ शाळा आहेत. त्यापैकी गुरुवारी ५०२ शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसह सुरू झाल्या, तर ४८३ शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत.शाळा सुरू करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव आणि पालकांची संमती हे दोन निकष बंधनकारक करण्यात आले आहेत. या निकषांची पूर्तता न झाल्याने काही शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. मात्र, येत्या काही दिवसांत याही शाळा सुरू होतील, असा विश्वास शिक्षण विभागातून व्यक्त करण्यात आला. गुरुवारी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स पाळून बसविण्यात आले. आल्या आल्या प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात आले. मास्क वापरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. विशेष म्हणजे, शाळांकडून या निकषांचे पालन होतेय किंवा नाही, याची पाहणी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी दिवसभर विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी म्हणून यावेळी  एका बाकावर एकच विद्यार्थी अशा स्वरूपात बैठक व्यवस्था करण्यात आली. 

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या