शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत विजेचा शॉक देऊन अस्वलाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST

पाळोदी बीटमधील जलांद्री शिवारात शुक्रवार रात्रीदरम्यान अस्वलाची शिकार करण्यात आली. नर अस्वलाचे गुप्तांग उत्तेजक औषधी म्हणून सेवन केले जाते. याच समजातून अस्वलाची शिकार केली. मात्र नंतर ते नर नसून मादा अस्वल असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिकाऱ्यांनी पंजे कापून तिचा मृतदेह नदीच्या प्रवाहात फेकून दिला.

ठळक मुद्देमादा असल्याने फेकले : वन विभाग होता अनभिज्ञ, तीन दिवसानंतर झाला उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दक्षिण आर्णी रेंजमध्ये येत असलेल्या पाळोदी बीटात तारांमध्ये वीज प्रवाह सोडून अस्वलाची शिकार करण्यात आली. अस्वल मादा असल्याने नदीत फेकून दिले. त्याचे चारही पंजे नखासाठी कापण्यात आले होते. प्रवाहात काही अंतरावर वाहून गेलेला हा मृतदेह झाडाच्या बुंद्याला अडकून राहिला. या घटनेची तब्बल चार दिवसानंतर वन विभागाला माहिती मिळाली. यावरून काही संशयितांना ताब्यातही घेतले आहे.पाळोदी बीटमधील जलांद्री शिवारात शुक्रवार रात्रीदरम्यान अस्वलाची शिकार करण्यात आली. नर अस्वलाचे गुप्तांग उत्तेजक औषधी म्हणून सेवन केले जाते. याच समजातून अस्वलाची शिकार केली. मात्र नंतर ते नर नसून मादा अस्वल असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिकाऱ्यांनी पंजे कापून तिचा मृतदेह नदीच्या प्रवाहात फेकून दिला. मृतदेह वाहत जावून काही अंतरावर झाडाच्या बुंद्यात अडकला. त्याचा दुर्गंध परिसरात येऊ लागला. शिकार करणाऱ्यांनी मृत अस्वलाचे फोटोही मित्रांमध्ये सोशल मीडियावरून शेअर केल्याची माहिती आहे. यावरूनच अस्वलाच्या शिकारीच्या चर्चेचे पेव फुटले. कधी तरी मुख्यालयी येणाºया वन अधिकाºयाला याची माहिती मिळाली. सुरुवातीला प्रकरण जागेवरच निपटवण्याचा प्रयत्नही झाला. मात्र दुर्मीळ वन्यजीवात मोडणाºया अस्वलाचे प्रकरण असून काही लाभ होत नसल्याने अखेर कारवाईसाठी पुढाकार घेण्यात आला. कुजलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून जाळून नष्ट केला. या प्रकरणात दोघांना अटक केली. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. आता त्या संशयितांच्या माध्यमातून काही आर्थिक प्रतिष्ठित गळाला लागतात काय, याचा प्रयत्न होत आहे. पांढरकवडा न्यायालयाने यातील आरोपींना १४ दिवसांची वन कोठडी सुनावली होती. याच काळात प्रकरण कॅश करण्यासाठी तपासाला आणखी गती देण्याचे काम सुरू आहे. मात्र शिकार झाल्यानंतर ही घटना बºयाच उशिराने वन विभागाला कळली. अधिकाºयाचे थेट यवतमाळवरून अपडाऊन असल्याने अनेक प्रकरणे बाहेरच येत नाहीत. दुर्मिळ वन्यजीवाचे प्रकरणात वरिष्ठांनी चौकशी केल्यास अनेक त्रुट्या पुढे येण्याची शक्यता वनवर्तुळातच वर्तविली जात आहे.पिकाच्या संरक्षणासाठी तारेच्या कुंपनात वीज प्रवाह सोडण्यात आला. यामुळेच जलांद्री येथे अस्वलाचा मृत्यू झाला. शिकारीचा उद्देश दिसत नाही. सोमवारी वन विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीचा शोध घेवून अटकेची कारवाई करण्यात आली आहे.- विपूल राठोडसहायक वनसंरक्षक, आर्णी

टॅग्स :forest departmentवनविभाग