आर्णीत विजेचा शॉक देऊन अस्वलाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:20+5:30

पाळोदी बीटमधील जलांद्री शिवारात शुक्रवार रात्रीदरम्यान अस्वलाची शिकार करण्यात आली. नर अस्वलाचे गुप्तांग उत्तेजक औषधी म्हणून सेवन केले जाते. याच समजातून अस्वलाची शिकार केली. मात्र नंतर ते नर नसून मादा अस्वल असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिकाऱ्यांनी पंजे कापून तिचा मृतदेह नदीच्या प्रवाहात फेकून दिला.

Bear hunting with lightning shock in the arena | आर्णीत विजेचा शॉक देऊन अस्वलाची शिकार

आर्णीत विजेचा शॉक देऊन अस्वलाची शिकार

googlenewsNext
ठळक मुद्देमादा असल्याने फेकले : वन विभाग होता अनभिज्ञ, तीन दिवसानंतर झाला उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दक्षिण आर्णी रेंजमध्ये येत असलेल्या पाळोदी बीटात तारांमध्ये वीज प्रवाह सोडून अस्वलाची शिकार करण्यात आली. अस्वल मादा असल्याने नदीत फेकून दिले. त्याचे चारही पंजे नखासाठी कापण्यात आले होते. प्रवाहात काही अंतरावर वाहून गेलेला हा मृतदेह झाडाच्या बुंद्याला अडकून राहिला. या घटनेची तब्बल चार दिवसानंतर वन विभागाला माहिती मिळाली. यावरून काही संशयितांना ताब्यातही घेतले आहे.
पाळोदी बीटमधील जलांद्री शिवारात शुक्रवार रात्रीदरम्यान अस्वलाची शिकार करण्यात आली. नर अस्वलाचे गुप्तांग उत्तेजक औषधी म्हणून सेवन केले जाते. याच समजातून अस्वलाची शिकार केली. मात्र नंतर ते नर नसून मादा अस्वल असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिकाऱ्यांनी पंजे कापून तिचा मृतदेह नदीच्या प्रवाहात फेकून दिला. मृतदेह वाहत जावून काही अंतरावर झाडाच्या बुंद्यात अडकला. त्याचा दुर्गंध परिसरात येऊ लागला. शिकार करणाऱ्यांनी मृत अस्वलाचे फोटोही मित्रांमध्ये सोशल मीडियावरून शेअर केल्याची माहिती आहे. यावरूनच अस्वलाच्या शिकारीच्या चर्चेचे पेव फुटले. कधी तरी मुख्यालयी येणाºया वन अधिकाºयाला याची माहिती मिळाली. सुरुवातीला प्रकरण जागेवरच निपटवण्याचा प्रयत्नही झाला. मात्र दुर्मीळ वन्यजीवात मोडणाºया अस्वलाचे प्रकरण असून काही लाभ होत नसल्याने अखेर कारवाईसाठी पुढाकार घेण्यात आला. कुजलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून जाळून नष्ट केला. या प्रकरणात दोघांना अटक केली. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. आता त्या संशयितांच्या माध्यमातून काही आर्थिक प्रतिष्ठित गळाला लागतात काय, याचा प्रयत्न होत आहे. पांढरकवडा न्यायालयाने यातील आरोपींना १४ दिवसांची वन कोठडी सुनावली होती. याच काळात प्रकरण कॅश करण्यासाठी तपासाला आणखी गती देण्याचे काम सुरू आहे. मात्र शिकार झाल्यानंतर ही घटना बºयाच उशिराने वन विभागाला कळली. अधिकाºयाचे थेट यवतमाळवरून अपडाऊन असल्याने अनेक प्रकरणे बाहेरच येत नाहीत. दुर्मिळ वन्यजीवाचे प्रकरणात वरिष्ठांनी चौकशी केल्यास अनेक त्रुट्या पुढे येण्याची शक्यता वनवर्तुळातच वर्तविली जात आहे.

पिकाच्या संरक्षणासाठी तारेच्या कुंपनात वीज प्रवाह सोडण्यात आला. यामुळेच जलांद्री येथे अस्वलाचा मृत्यू झाला. शिकारीचा उद्देश दिसत नाही. सोमवारी वन विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीचा शोध घेवून अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
- विपूल राठोड
सहायक वनसंरक्षक, आर्णी

Web Title: Bear hunting with lightning shock in the arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.