गोपाल भक्तांपुढे खरेदीचे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:01:38+5:30
जिल्ह्यात गोकुळ अष्टमी उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्याची मोठी परंपरा असणारे मंडळ नाही. मात्र घरोघरी हा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी गोपालकृष्णाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. यावर्षी मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तगण तयार होते. मात्र त्यांना मूर्ती मिळाल्याच नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मंगळवारी गोकुळाष्टमी आहे. गोपालभक्तांच्या घरोघरी हा उत्सव साजरा होतो. या उत्सवाकरिता भक्त मूर्तिकारांकडून मूर्ती खरेदी करतात. यावर्षी रिमझिम स्वरूपाचा पाऊस आणि वर्दळीवर असणारी बंदी यामुळे भक्तांना गोपाल कृष्णाच्या मूर्ती खरेदी करता आल्या नाही. यातून गोपालभक्त आणि मूर्तिकार चांगलेच अडचणीत आले.
जिल्ह्यात गोकुळ अष्टमी उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्याची मोठी परंपरा असणारे मंडळ नाही. मात्र घरोघरी हा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी गोपालकृष्णाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. यावर्षी मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तगण तयार होते. मात्र त्यांना मूर्ती मिळाल्याच नाही.
पाऊस आणि शहराकडे जाणाऱ्या वाहनांची कमी झालेली वर्दळ या प्रमुख कारणाने गोपाल भक्तांना विविध अडचणीचा सामना करावा लागला. शहरात मूर्तिकारांना मूर्ती विकता येणार किंवा नाही याची शाश्वती नव्हती. यामुळे मूर्तिकांरानी आधीच कमी मूर्ती घडविल्या आहेत. त्यातही सोमवारी सकाळपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस होता. यातून मूर्तिकांराना आपल्या मूर्ती सुरक्षित स्थळी हलवाव्या लागल्या. काहींनी चक्कम मेडिकल आणि कापड दुकानात मूर्ती ठेवल्या. यातून खरेदी करणाºया ग्राहकाला याची माहितीच मिळाली नाही.
यावर्षी मूर्तीचे दरही अधिक राहिले. यामुळे गोपालभक्तांसाठी यावर्षी मूर्ती खरेदी करणे आणि उत्सव करणे परीक्षेप्रमाणेच अवघड काम ठरले. याचा फटका भक्तांना आणि मूर्तिकारांना सहन करावा लागला.
मंदिराचे द्वार बंदच, फक्त रोषणाईला परवानगी
मंदिराचे प्रवेशद्वार उघडण्याच्या सूचना नाही. यामुळे गोपालकृष्ण मंदिराला याचा फटका बसला. केवळ गर्भगृहात पूजा करून मंदिरावर रोषणाई करता येणार आहे. या ठिकाणच्या सार्वजनिक उत्सवावर बंदी राहणार आहे. मात्र घरोघरी उत्सव होणार आहे.